१८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
१८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
१९१२: भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१९१३: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
१९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
१९९६: अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
१९९९: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.
२००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO)
महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे
धनुष हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
२०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.