जन्मदिवस / वाढदिवस
१८५८: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल . (मृत्यू: २० मे १९३२)
१८६७: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा. (मृत्यू: ४ जुलै १९३४)
१८६८: व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले. (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)
१८७९: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की . (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)
१८८४: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे . (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)
१८८८: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण . (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)
१९००: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा . (मृत्यू: ९ जून १९९५)
१९०३: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे.
१९१५: महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख .
१९५४: अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक कमल हासन.
१९६०: भारतीय चित्रपट निर्माते श्यामप्रसाद.
१९७१: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक त्रिविक्रम श्रीनिवास .
१९७५: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक वेंकट प्रभू .
१९८०: भारतीय गायक-गीतकार कार्तिक.
१९८१: भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी .
१५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड . (जन्म: ५ डिसेंबर १५११)
१८६२: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर . (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)
१९०५: कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत–मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता
प्रसिद्ध झाली नाही. केशवसुतांची कविता हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या तुतारी, नवा शिपाई, गोफण केली
छान इ. कविता प्रसिद्ध आहेत. (जन्म: ७ आक्टोबर १८६६)
१९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता . (जन्म: २५ जानेवारी १८५६)
१९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर.
१९६३: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी –मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक. वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा
या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. दुधाची घागर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)
१९८०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्वीन . (जन्म: २४ मार्च १९३०)
१९८१: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट. (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)
१९९८: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी . (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)
२०००: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम . (जन्म: ३० जानेवारी १९१०)
२००६: भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर . (जन्म: २८ मार्च १९२६)
२००९: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे . (जन्म: ३ जुलै १९२६)
२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)