संत नामदेवांचे कुटूंब वारकरी संप्रादयाचे होते. जवळ- जवळ अठरा माणसांचे कुटुंब पांडुरंगाच्या भक्तीत लीन होते. घरच्या या वातावरणाचा प्रभाव संत नामदेवावर झाला. बालपणी झालेले संस्कार आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. नामदेवांचे वडील दामाशेठी व आई गोणाई हे प्रामाणिक विठ्ठल भक्त होते.
संत नामदेवांची भक्ती सर्वश्रुत होती व ते भगवान विठ्ठलाचे सर्वात लाडके होते. एकदा त्यांचे वडील बाहेर काही कामानिमित बाहेर गेले होते तेव्हा देवाचा नैवेद्य घेऊन नामा गेले तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातांनी पांडुरंगाला जेऊ घातले यामुळे ते लोकांत प्रसिद्ध झाले. संत नामदेवांनी आपले सगळे जीवन वारकरी सेवेत घालवले त्यांना कधीही अहंकार आला नाही . ते नेहमी देवाच्या गुण नामातच रमले. संत ज्ञानेश्वर, निवृतीनाथ, सोपानदेव, गोरोबा, मुक्ताई, चोखामेळा हे त्यांचे समकालीन संत होते . त्यांचे अध्यात्मिक गुरु विसोबा खेचर होते. आपल्या वारकरी जीवनात अनेक प्रकारचे अभंग, गौळणी अशा अनेक प्रकारचे लिखाण नामदेवरायांनी केले. संत जनाबाईंना त्यांच्या घरी आश्रय दिला गेला व त्यांना देखील अध्यात्मिक ज्ञान दिले. हे सर्व नामदेवरायामुळे झाल्यामुळेच जनाबाईचा उल्लेख नेहमी, ‘ दासी जनी नामयाची’ असाच होतो .
नामदेवरायांचे कीर्तन हे त्यावेळेला चर्चेचा विषय ठरत असे. खुद्ध विठ्ठल भगवान कीर्तनाला हजर राहत असे .
‘ नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ।’
इतकी शक्ती त्यांच्याकडे होती . त्यांचा शुद्ध भाव होता जो देवाला देखील आवडत असे .
भागवत धर्माची पताका त्यांनी महाराष्ट्राबाहेर नेली लोकांना भक्तीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्री गोविंद ग्रंथ साहिब या शिख लोकांच्या पवित्र ग्रंथात नामदेवरायांची अभंग व वर्णने केलेली आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाना या ठिकाणी नामदेवरायांची मंदिरे देखील बांधलेली आहे. त्याकाळी भक्ती बरोबरच देशप्रेमाचे बीज लोकांच्या मनात रुजवण्याचे काम केले.