- पार्श्वभूमी :
‘मृदुमान्य’ नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करुन ‘तुला कोणाकडूनही मरण येणार नाही’ असा वर शंकराकडून मागून घेतला. पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रम्हा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता. त्यामुळे तीन दिवस झाले तरी देवांना बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली. तिने मृदुमान्याला ठार मारले. तीच ही एकादशी होय.
साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :
या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन, स्वत:चे आचरण शुध्द करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करुन पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावयाचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात. या दिवशी लोक गंगेकाठी स्नान करतात. पूजेच्या वेळी एक हजार किंवा एकशेआठ तुळशी विष्णूला वहातात. सारा वेळ भजन-पूजनांत घालवतात.
- वैशिष्ट्य :
या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राचे कानाकोपर्यातून संतांच्या पालख्यासह लाखो वारकरी विठ्ठल दर्शना साठी येथे जमतात. गावागावातील विठ्ठल मंदिरामधून भाविकांची गर्दी उसळते. भजन, कीर्तन ,प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
- खाद्यपदार्थ :
उपवासाचे जिन्नस