जालना जिल्हा पर्यटन

श्री गणपती मंदीर, राजूर

श्री राजुर गणपती

गणपती मंदीर, राजूर हे जिल्‍हयाच्‍या उत्‍त्‍ारेस 25 कि.मी. अंतरावर स्‍थीत आहे. प्रत्‍येक चतुर्थीला अनेक भावीक दर्शनासाठी येतात. अंगारकी चतुर्थी निमीत्‍त बहुतांश भाविक गणपतीचे दर्शन घेण्‍यासाठी मंदिरामध्‍ये हजेरी लावतात.
राजूर हे गणेशाचे एक पूर्ण पिठ म्‍हणून गणेश पुराणामध्‍ये मानले गेले आहे. तसेच इतर पिठ म्‍हणून मोरगाव, चिंचवड (पुणे) असून राहिलेले अर्धे पिठ पदमालय हे आहे. राजूर मंदिराचे नुतनीकरणाचे काम सुरू असून सध्‍या ते अखेरच्‍या टप्‍यामध्‍ये आहे.

गुरू गणेश तपोधाम

गुरुगणेश भवन

जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश भवन हे एक महत्‍वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश भवन हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्‍थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्‍टमार्फत या धार्मीक स्‍थळाची देखरेख व विकासाची कामे केली जातात. या ट्रस्‍टमार्फत शालेय संस्‍थान, महाविद्यालय, अंधांची शाळा, ग्रंथालय, गोशाला चालविल्‍या जातात. संस्‍थानची गोशाला ही मराठवाडयामध्‍ये सर्वात मोठी गोशाला आहे.

मत्‍स्‍योदरी देवी मंदिर, अंबड

श्री मत्स्योदरी देवी मंदिर अंबड

अंबड येथील मत्‍स्‍योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्‍या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्‍या टेकडीवर स्थित आहे त्‍या टेकडीचा आकार मासोळी (मत्‍स्‍य) सारखा आहे. त्‍यामुळे या देवीस मत्‍स्‍योदरी देविचे मंदिर म्‍हणून ओळखले जाउ लागले. हे मंदिर जवळपासच्‍या क्षेत्रातील अत्‍यंत जुन्‍या मंदिरांपैकी एक आहे.
ऑक्‍टोबर महिन्‍यामध्‍ये नवरात्र महोत्‍सवाच्‍या निमीत्‍ताने दरवर्षी या मंदिरामध्‍ये मोठी यात्रा भरते

मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ

मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब

मौलया नुरुद्दीन यांची समाधी मजार-इ-मौलया, डोणगांव ता. अंबळ, जि. जालना येथे आहे. मौलया नुरुद्दीन यांची “वली अल-हिंद” (भारतीय प्रतिनिधी / काळजीवाहू) या पदावर “दाऊदी बोहरा दावत”,  येमेन केंद्रातर्फे नियुक्त करण्यात आले होते. मौलया नुरुद्दीन हे शिक्षण घेण्यासाठी, कैरो, इजिप्त गेले. ते 467 AH मध्ये भारतात परत आले आणि डेक्कन गेला. त्यांचा मृत्यू “जुमादी-अल-उला 11” मध्ये डोणगांव ता. अंबड, जि. जालना येथे मृत्यू झाला.

जांबसमर्थ, घनसावंगी

जाम्ब समर्थ मंदिर

जांबसमर्थ येथे संत रामदास स्‍वामी यांचा जन्‍म झाला. हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे. समर्थ रामदास स्‍वामी यांचा जन्‍म चैत्र शुक्‍ल नवमी शके 1530 (हिंदू दिनदर्शिकेनुसार) सायं. 12 झाला होता. अगदीरामजन्‍माचे वेळी. राम मंदिरामध्‍ये दर वर्षी राम नवमी निमीत्‍त यात्रा भरते. हे राम मंदिर रामदास स्‍वामी यांच्‍या घरामध्‍ये स्‍थीत आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्‍वामी यांच्‍या आठवणीमध्‍ये बनविण्‍यात आले आहे. एका संस्‍थेमार्फत या मंदिराचे व्‍यवस्‍थापन पाहिले जाते. ज्‍याची स्‍थापना 1943 साली नानासाहेब देव यांनी केली. 55 सदस्‍य व 11 ट्रस्‍टी या संस्‍थेव्‍दारे करण्‍यात आले. आता संस्‍थेची स्‍वतःची 240 हेक्‍टर जमिन आहे. संस्‍थेमार्फत येथे राहण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. ही ईमारत माता राणी होळकर, इंदोर यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ देवी अहिल्‍याबाई होळकर यांनी दिलेल्‍या देणगीमधून बनविण्‍यात आली आहे.