मकरसंक्रांत

जागतिक दिवस

लष्कर दिन
जॉन चिलेम्ब्वे दिन : मलावी.
कोरियन लिपी दिन : उत्तर कोरिया.

घटना/घडामोडी

१७६१ : पानिपतचे तिसरे युध्द संपले

१९१९ : छत्रपती शाहू महाराजांनी स्पृश-अस्पृशांना एकत्रित शिक्षण व्यवस्था सुरु केली.

१९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.

१९९९ : ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश वीकिपीडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

जन्म/वाढदिवस

१९२६ : खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.

१९२९ : डॉ.मार्टिन लुथर किंग, अमेरिकन नागरी अधिकार चळवळीचा नेता.

१९५६ : मायावती, भारतीय राजकारणी.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१९७१ : दीनानाथ दलालमहाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन.

१९९८ : गुलझारीलाल नंदा, माजी भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते.

२००२ : विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत.

२०१४ : नामदेव ढसाळ (नामदेव लक्ष्मण ढसाळ)