घटना

१७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

१७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

१८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

१८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.

१९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.

१९७२: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

२०००: फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

जन्म

१८८२: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९४३)

१८९४: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)

१९१०: गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७५)

१९२४: माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)

१९५३: मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक पॉल अ‍ॅलन यांचा जन्म.

मृत्यू

१७९३: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)

१९०१: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३५)

१९२४: रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८७०)

१९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)

१९४५: क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन. (जन्म: २५ मे १८८६)

१९५०: इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन. (जन्म: २५ जून १९०३)

१९५९: दिगदर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते सेसिल बी. डी. मिल यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८१)

१९६५: अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.

१९९८: भारताचे ९ वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन. (जन्म: २१ जून १९१६)