घटना
१९११: जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
१९३३: ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
१९४८: नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.
१९७२: पाकिस्तानने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
१९७९: टोक्योहून निघालेले व्हारिग एरलाइन्सचे बोईंग ७०७-३२३सी जातीचे विमान नाहीसे झाले.
१९८९: अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.
१९९४: पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.
२००२: भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.
जन्म
१३३: मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस, रोमन सम्राट.
१९१०: चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.
१९४१: रिचर्ड चेनी, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
१९६१: रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१६४९: चार्ल्स पहिला, इंग्लंडचा राजा.
१९४८: महात्मा गांधी
१९४८: ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
१९९६: गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक.
२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.
२००१: प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार.
२००४: रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार.