घटना

१६८९: संगमेश्वरावर संभाजीराजेना कैद करण्यात आले.

१७९०: न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले.

१७९३: फ्रांसने नेदरलँड्स व युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.

१८६१: अमेरिकन यादवी युद्ध – टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले.

१८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.

१९४३: दुसरे महायुद्ध – नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.

१९४६: नॉर्वेच्या त्रिग्वे लीची संयुक्त राष्ट्रांच्या प्रथम सरचिटणीस पदी निवड.

१९५९:`रोहिणी’ मासिकाने `शुभमंगल मेळा’ घेण्यास सुरुवात केली.

१९७४: साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी.

१९७७: भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.

१९७९: रुहोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला.

१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.

२००२: आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणार्‍या ‘गुड फ्रायडे’ कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.

२००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.

जन्म

१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, जगप्रसिध्द निग्रो कृषितज्ज्ञ.

१८८२: लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.

१८८४: सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.

१९०१: क्लार्क गेबल, अमेरिकन अभिनेता.

१९०४: बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी.

१९१०: जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९३०: शहाबुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.

१९३१: बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.

१९३१: इयाजुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.

१९५८: जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.

१९६५: डेव्ह कॅलाहन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९७१: अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९७२: कर्टली ऍम्ब्रोझ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९८१: ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

१३२८: चार्ल्स चौथा, फ्रांसचा राजा.

१५६३: मेनास, इथियोपियाचा सम्राट.

१६९१: पोप अलेक्झांडर आठवा.

१७३३: ऑगस्टस दुसरा, पोलंडचा राजा.

१९०८: कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा.

१९८१: डोनाल्ड विल्स डग्लस, सिनियर, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.

१९९५: मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.

२००३: स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर – मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन