नवग्रह स्तोत्र

नऊ ग्रहांचे नऊ मंत्र असं नवग्रह स्तोत्र व्यास ऋषींनी रचलेले आहे नऊ मंत्रच आहेत.

१) सूर्य :- जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् । तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ॥

जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणारा दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.

२) चंद्र :- दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव-संभवम् । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम् ॥

दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणारा, क्षीरसागरांतून निर्माण झालेला, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणारा आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.

३) मंगळ :- धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ॥

धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.

४) बुध:- प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम् । सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥

अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.

५) गुरू :- देवानांच ‍ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम् । बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥

देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.

६) शुक्र :- हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परम् । सर्वशास्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥

हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.

७) शनी :- नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् । छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥

निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.

८) राहू :- अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् । सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥

अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.

९) केतु :- पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम् । रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ॥

पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.

इतिव्यासमुखोद्गीतं य: पठेत् सुसमाहित:। दिवा वा यदि वा

रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यति ॥

-याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.

नरनारि नृपाणांच भवेत् दु:स्वप्ननाशनम् । ऎश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् ॥

– नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.

ग्रहनक्षत्रजा: पीडास्तस्कराग्निसमुद्भवा:। ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासोब्रूते न संशय: ॥

– ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.

अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.

* मंत्र शास्त्रात उच्चाराला महत्व असल्याने अधिकारी, जाणत्या व्यक्तिकडून शुय्द्ध उच्चर शिकून घेऊन नंतर पाठ करावे.

 नवग्रहांचे नाम मंत्र, जपसंख्या, दानाच्या वस्तू कोणत्या ? हे पाहूया….

सूर्य :- ॥मंत्र – सूर्यायनम: ॥ ॥ जपसंख्या – सात हजार.॥

॥दाने :- धातु- सुवर्ण ॥ ॥उपधातु :- तांम्र(तांबे)॥

॥रत्न :- माणिक॥ ॥धान्य :- गहू ।।

॥पशु :-रक्तधेनु(लाल रंगाची गाय.॥ ॥ रस :- गुळ. ॥

॥वस्त्र :- केशरीरंगाचे वस्त्र ॥

॥पुष्प :-रक्तकमळ(लालकमळ)

चंद्र :- ॥मंत्र :- सोमायनम: ॥

॥ जपसंख्या –अकरा हजार.॥

॥दाने :- धातु :- सुवर्ण ॥

॥उपधातु :- रौप्य(चांदी)॥

॥रत्न :- मोती ॥

॥धान्य :- तांदूळ ॥

॥पशु :-श्वेतवृष(सफ़ेदरंगाचा रेडा)

॥रस :- तूप ॥

॥वस्त्र :- श्वेतवस्त्र ॥

॥पुष्प :- श्वेतपुष्प ॥

मंगळ :- ॥मंत्र:- अंगारकायनम:॥

॥ जपसंख्या – दहा हजार.॥

॥ दाने :- धातु :- सुवर्ण ॥

॥उपधातु :- ताम्र(तांबे)॥

॥रत्न :- प्रवाळ॥

॥धान्य :- मसुर ॥

॥ पशु :-रक्तवृष(लालरंगाचा रेडा)

॥ रस :- गूळ ॥

॥वस्त्र :- रक्तवस्त्र(लालरंगाचे वस्त्र) ॥

॥ पुष्प :-रक्तकमळ(लालकमळ)

बुध :- ॥मंत्र :- बुधायनम: ॥

॥ जपसंख्या – चार हजार.॥

॥दाने :- धातु :- सुवर्ण ॥

॥ उपधातु :- कांस्य(कासे)॥

॥रत्न :- पाचू॥

॥ धान्य :- मूग ॥

॥ पशु :- हत्ती ॥

॥ रस :- तूप ॥

॥वस्त्र :- नीलवस्त्र(निळ्यारंगाचे वस्त्र ॥

॥पुष्प:- सर्वप्रकारची फ़ुले ॥

गुरू :- ॥बृहस्पतयेनम: ॥

॥जपसंख्या :- एकोणीस हजार. ॥

॥दाने :- धातु :- सुवर्ण ॥

॥ उपधातु :- कांस्य(कासे)॥

॥रत्न:- पुष्कराज ॥

॥धान्य :- हर्बराडाळ ॥

॥पशु :- अश्व (घोडा)॥

॥रस :- साखर ॥

॥वस्त्र :- पीतवस्त्र(पिवळ्यारंगाचे वस्त्र)

॥पुष्प :- पीतपुष्प :- पिवळ्यारंगाचे फ़ूल. ॥

शुक्र :- ॥मंत्र-शुक्रायनम: ॥

॥जपसंख्या :- सोळाहजार. ॥

॥दाने :- धातु :- सुवर्ण ॥

॥उपधातु :- रौप्य(चांदी)॥

॥रत्न :- हिरा ॥

॥धान्य :- तांदूळ ॥

॥पशु :- श्वेताश्व(सफ़ेदघोडा)॥

॥रस :- तूप ॥

॥वस्त्र :-चित्रवस्त्र(निरनिराळ्यारंगाचे)॥

॥पुष्प :- श्वेतपुष्प(सफ़ेद)॥

शनी :- ॥मंत्र-शनैश्चरायनम: ॥

॥जपसंख्या :- तेवीस हजार ॥

॥दाने :- धातु :- सुवर्ण ॥

॥उपधातु :- लोखंड॥

॥ रत्न :-नीलमणी ॥

॥धान्य :- उडीद ॥

॥ पशु :- म्हैस ॥

॥ रस :- तेल ॥

॥वस्त्र :- कृष्णवस्त्र(काळ्यारंगाचे) ॥

॥पुष्प :- कृष्णपुष्प(काळ्या/जांभळ्या रंगाचे फ़ूल ॥

राहू :- ॥ मंत्र :- राहवेनम: ॥

॥ जपसंख्या :- अठरा हजार ॥

॥ दाने :- धातु :- सुवर्ण ॥

॥उपधातु :- शिसे ॥

॥ रत्न:- गोमेद ॥

॥धान्य :- तीळ ॥

॥पशु :- घोडा ॥ ॥ रस :- तेल ॥

॥ वस्त्र :- नीलवस्त्र(निळ्यारंगाचे)॥

॥पुष्प :- कृष्णपुष्प(काळ्या/जांभळ्या रंगाचे फ़ूल ॥

केतु :- ॥मंत्र :- केतवेनम: ॥

॥ जपसंख्या :- सतरा हजार. ॥

॥दाने :- धातु :- सुवर्ण ॥

॥उपधातु :- पोलाद ॥

॥रत्न:- लसण्या॥

॥धान्य :- तीळ ॥

॥ पशु :- बोकड ॥

॥ रस :- तेल ॥

॥वस्त्र :-कृष्णवस्त्र(काळ्यारंगाचे)॥

॥ पुष्प :- राखाडी/भुरा रंग॥