चाणक्य

(इ.स.पू.सु. चौथे शतक). प्राचीन भारताच्या राजकीय विचारपरंपरेत चाणक्याचे म्हणजे कौटिल्याचे विशिष्ट व महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याने अर्थशास्त्रसंज्ञक ग्रंथ राज्यशास्त्रावर लिहीला. मात्र त्या ग्रंथात कोठेही चाणक्य म्हणून नामानिर्देश येत नाही, तर कौटिल्य असाच वारंवार नामनिर्देश येतो. त्याचा काल अजमावण्याचे निश्चित साधन उपलब्ध नाही. काही त्याला मनूच्या अगोदरचा समजतात, तर काही त्याला महाभारतकालानंतरचा समजतात. चंद्रगुप्त मौर्याचा पंतप्रधान या नात्याने चाणक्याचा उल्लेख अनेकदा येतो. तो काळ इ.स.पू. ३२१ च्या सुमाराचा आहे. अशोकाच्या शिलालेखात अर्थशास्त्राप्रमाणे क्वचित सूचना आणि अधिकाऱ्यांची नामे सापडतात. महामहोपाध्याय डॉ. काणे यांच्या मते कौटिल्याचा काल इ.स.पू. ३०० च्या अगोदर मानता येत नाही.

आर्य चाणक्य यांना विष्णूगुप्ता किंवा कौटिल्य देखील म्हटले जात होते. प्राचीन भारताचं राजकीय आणि कुटनीती शास्त्राचा पाया त्यांनी घेतल्या. आजही चाणक्य नीतीमधील काही तत्व राजकारणात वापरली जातात.चाणक्याने मगध देशाचा राजा धननंद याला सिंहासनावरून पदच्युत करून चंद्रगुप्त मौर्याची स्थापना शस्राच्या आणि शास्राच्या आधारावर केली. चाणक्य हा विष्णुगुप्त, कौटिल्य इ. नावांनीही ओळखला जातो. कौटिल्यास भारतीय मॅकिआव्हेली म्हणण्याचा प्रघात आहे.

चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य उभारण्यासाठी आर्य चाणक्य यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मौर्य साम्राज्य एक प्रभावी साम्राज्य म्हणूनही उदयास आलं.

आर्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते.

चाणक्याच्या नावावर चाणक्यस्त्रे, चाणक्यनीति, वृद्धचाणक्य, लघुचाणक्य इ. अनेक नीतिग्रंथ प्रसिद्ध आहे

चाणक्य यांचे मराठी सुविचार

1.कोणत्याही माणसाला इमानदार नाही असले पाहिजे कारण सर्वात प्रथम सरळ वृक्षावरच कुऱ्हाड चालवली जाते.

2. प्रत्येक साप विषारी नसतो पण प्रत्येक सापाला अस भासवाव लागत तो विषारी आहे

3. तुमची भीती तुमच्या समोर उभी ठाकेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवुन टाका

4. इतरांच्या चुकीतुनही शिका कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल

5. माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे

6. मनुष्याने आयुष्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चार गोष्टींसाठी पराकाष्ठा केली पाहिजे. ज्याने यातील एकाही गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही त्याने आयुष्य वाया घालवले आहे.

7. मत्सर हे अपयशाचे दुसरे नाव आहे.

8. काही करण्याची प्रेरणा होते तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.