झिंगीनृत्य

ठाणे जिल्ह्यात ‘झिंगीनृत्य’ हे ‘झिंगी’ किंवा ‘झिंगीचिकी’ या नावाने ओळखले जाते. ‘झिंगीनृत्य’ हे नाव प्रमाण भाषेत आढळते. कातकरी लोक त्याला ‘झिंगीनृत्य’ म्हणून क्वचितच ओळखतात.

कातकरी त्याला ‘डबा-ढोलकीचा नाच’ म्हणतात. पत्र्याचा डबा व ढोलकीचा ठेका यांवर आरंभी ताल धरला जातो. त्यावरून त्यास ‘झिंगीनृत्य’ असे नाव आहे. त्याविषयी आणखीही काही बोलवा आहेत. एक मत असे, की “कातकरी लोक दारू पितात. दारू प्यायल्याने त्यांना झिंग येते. त्या झिंगलेल्या अवस्थेत केला जाणारा नाच म्हणजे झिंगीचा नाच!”

दुसरे मत असे, की “नृत्य सादर करणारे कलाकार पाय मागेपुढे करत नाचताना जागेवरच जोराने गिरकी घेतात, म्हणून त्या नाचाला ‘झिंगी’ असे म्हटले जाते

Click here to add your own text