घटना
१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
१८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
१९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९९८: स्तनांचा कर्करोग बरा करणार्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
२०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले
जन्म/वाढदिवस
१७७३: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल. (मृत्यू: २३ जून १८३६)
१८६४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी. (मृत्यू: २३ जानेवारी १९३४)
१८९०: फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर. (मृत्यू: २३ डिसेंबर १९३९)
१८९०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९६०)
१८९२: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस . (मृत्यू: १ फेब्रुवारी १९८१)
१९०९: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९४)
१९१७: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु. (मृत्यू: १८ नोव्हेंबर २००६)
१९१९: कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित.
१९२७: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग. (मृत्यू: २८ जून २०००)
१९२८: फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन.
१९३१: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४ – कोलकता, पश्चिम बंगाल)
१९५६: क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर.
मृत्यू/पुण्यतिथी
११९९: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर ११५७)
१९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.
१९८१: मानवधर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर.
१९८३: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी . (जन्म: १० जून १९०८)
१९८९: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल. (जन्म: ७ मे १९१२ – मांडली, डुंगरपूर, राजस्थान)
१९९२: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह . (जन्म: २ जानेवारी १९२०)