ठळक घटना
१६०६: ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
१९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
१९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
१९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.
१९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
१९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
१९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले
जन्म
१४९९ : महावीर, जैन धर्मसंस्थापक.
ख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
१३८२: मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म.
१८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)
१९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)
१९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)
१९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८
१९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म
१९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म.
१९५४: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८९)
१९८१ : तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
मृत्यू
१७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १६६२)
१८१७: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन. (जन्म: २६ जून १७३०)
१९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)
१९१२: अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८२१)
१९४५: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १८८२)
२००१: NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९६०)
२००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२१)
२००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ यांचे निधन.
२००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९२९)