महत्त्वाच्या घटना
१६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
१८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
१९०१: न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.
१९३५: एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
१९३७: जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्यांना ठार केले.
१९७०: अॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९७२: दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले
१९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.
२००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
२००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
जन्मदिवस / वाढदिवस
१८१५: भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन . (मृत्यू: २६ जानेवारी १८७९)
१८९४: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा. (मृत्यू: २७ मार्च १९५२)
१८९७: क्रांतिकारक आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक रामप्रसाद बिस्मिल . (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
१९४८: बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव .
मृत्यू / पुण्यतिथी
ख्रिस्त पूर्व ३२३: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट . (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)
१७२७: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) . (जन्म: २८ मे १६६०)
१९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन . (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)
१९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे . (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)
१९५०: बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)
१९८३: भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९४)
१९९७: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन . (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)
२०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट . (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)