महत्त्वाच्या घटना
१०५४: वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.
१७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.
१८२६: अमेरिकेच्या १५व्या स्वातंत्र्य दिनी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचे निधन झाले.
१९०३: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान निकोबार बेटावरून कारावासास प्रारंभ झाला.
१९३६: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९४६: फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९४७: भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
१९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.
१९९७: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.
१९९९: लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.
जन्मदिवस / वाढदिवस
१७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट . (मृत्यू: १ डिसेंबर १८६६)
१८०७: इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेप्पे गॅरीबाल्डी . (मृत्यू: २ जून १८८२)
१८७२: अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कुलिज. (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)
१८८२: अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे सह्संस्थापक लुईस बी. मेयर . (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९५७)
१८९८: भारताचे २रे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा . (मृत्यू: १५ जानेवारी १९९८)
१८९७: भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू. (मृत्यू: ७ मे १९२४)
१९१२: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक . (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)
१९१४: भावगीत लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम . (मृत्यू: २२ डिसेंबर १९९७)
१९२६: विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा विनायक आदिनाथ बुवा. (मृत्यू: १७ एप्रिल २०११)
१९७६: जपानी मोटरसायकल रेसर दाइजिरो कातो . (मृत्यू: २० एप्रिल २००३)
१९८३: भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन .
मृत्यू / पुण्यतिथी
१८२६: अमेरिकेचे २रे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स . (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)
१८३१: अमेरिकेचे ५वे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो . (जन्म: २८ एप्रिल १७५८)
१९०२: भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद. (जन्म: १२ जानेवारी १८६३)
१९३४: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी . (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७)
१९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)
१९८२: भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास