महत्त्वाच्या घटना
१८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
१९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.
१९२७: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या.
याचेच पुढे ’आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.
१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारची परकीय शब्दांच्या वापरावर बंदी.
१९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.
१९८२: इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
१९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली.
१९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला.
जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार. १,००,००० नागरिकांनी भारत, युरोप आणि कॅनडात पलायन केले. येथून श्रीलंकेच्या नागरी युद्धाला सुरुवात झाली.
१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले.
वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.
१९८६: जैवअभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.
१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
२०१४: ट्रान्सएशिया एअरवेज फ्लाईट २२ हे एटीआर ७२-५०० प्रकारचे विमान मगाँग पेंघू विमानतळावर उतरताना पडले. ४८ ठार.
जन्मदिवस / वाढदिवस
१८५६: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक –समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे भाष्यकार (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
१८८५ : युलिसीस एस. ग्रॅन्ट –अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)
१८८६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी . (मृत्यू: ४ मार्च १९७६)
१८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान .
१९०६: चंद्रशेखर आझाद –स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)
१९१७: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे .
१९२५: बांगलादेशचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)
१९२७: जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी .
१९४७: अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे .
१९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच .
१९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी .
१९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेते आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.
१९७५: तमिळ अभिनेते सूर्य शिवकुमार.
१९७६: हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार .
मृत्यू / पुण्यतिथी