१६६६: शिवाजीराजांनी दख्खनमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.
१८२८: राजा राम मोहन रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या साहाय्याने
कोलकाता यथे ब्राम्हो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे ब्राम्हो समाज म्हणू लागले.
१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी (भारतात) हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. आल्मोडा येथे मलेरियावर केलेल्या संशोधनासाठी
त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.
१९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१९२०: डेट्रॉइट, मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
१९४१: दुसरे महायुद्ध –फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना
अटक केली. यातल्या ज्यूंना छळ छावण्यात रवाना करण्यात आले.
१९६०: सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९८८: इराण इराक युद्ध – सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.
१९९५: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
२००८: कुस्तीगीर सुशील कुमार यांना बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
१९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने . (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५)
१९८४: रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर –आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी फिरता जादूगार व मी पाहिलेला रशिया ही पुस्तके लिहिली आहेत. (जन्म: २४ मे १९२४)
१९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांची शेरपूर येथे एका गुरूद्वारात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. (जन्म: २ जानेवारी १९३२)
१९८८ : माधवराव शिंदे –चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. कन्यादान, धर्मकन्या या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले
तर शिकलेली बायको या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांचे मायेचा पाझर, संसार हे चित्रपट प्रसिद्ध आहेत.
१९९७: प्रागजी डोस्सा –गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (जन्म: ७ आक्टोबर १९०७)
२०००: प्राणलाल मेहता –चित्रपट निर्माते (किनारा, किताब, बेजुबान, मरते दम तक, पुलिस पब्लिक)
२००१: मधुकर रामराव तथा एम. आर. यार्दी –प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष (
२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा . (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)
२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांची पुणे येथे गोळ्या घालुन हत्या
२०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर . (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
२०१४: आयंगर योगाचे निर्माते बी.के.एस.अय्यंगार,योगविद्येची किर्ती जगभर पसरवणारे योगाचार्य. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)