आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन
महत्त्वाच्या घटना
७९: इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.
१६०८: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.
१६९०: कोलकाता शहराची स्थापना.
१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
१९३६: ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.
१९६६: रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले.
१९६६: विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९९१: युक्रेन सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
जन्मदिवस / वाढदिवस
१८३३:नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’–गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)
१८७२ : साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर –लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून केसरी व मराठाचे संपादन केले.
कायदेमंडळाचे सभासद, दहा नाटके, आठ कादंबर्या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. (मृत्यू: १४ आक्टोबर १९४७)
१८८०: बहिणाबाई चौधरी –कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती.
शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)
१८८८: बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर –स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त (मृत्यू: ८ मार्च १९५७)
१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर . (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)
१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू . (मृत्यू: २३ मार्च १९३१)
१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू .
१९१८: सिकंदर बख्त –केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ .
१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी .
१९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत . (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)
१९३२: रावसाहेब गणपराव जाधव –मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे तिसरे अध्यक्ष व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक (२००१ – २००३).
१९४४: ओडीसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही. (मृत्यू: २४ जून १९९७)
१९४५: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE)चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन .
मृत्यू / पुण्यतिथी
१९२५: संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर. (जन्म: ६ जुलै १८३७)
१९६७: कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर. (जन्म: ९ मे १८८२)
१९९३: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी.
भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२)
२०००: कल्याणजी वीरजी शाह –सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८)
२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै .
२०१८: जॉन मैककेन, जॉन सिडनी मॅककेन तिसरा हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर.(जन्मतारीख: २९ ऑगस्ट, १९३६)