१९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.
१९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.
१९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
१९५७: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
१९६२: त्रिनिदाद व टोबॅगोला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
१९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.
१९९१: किरगिझिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९९७: प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद हे पॅरिसमधे एका कार अपघातात ठार झाले.

१४२२: इंग्लंडचा राजा हेन्री (पाचवा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)
१९७३: शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९२)
१९९५:खलिस्तानी विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची चंडीगढ
येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बोम्बस्फोटाद्वारे हत्या (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)
२०१२: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९३८)
२०१२ : काशीराम राणा – भाजपाचे लोकसभा सदस्य (जन्म: ७ एप्रिल १९३८)
१९७३ : ताराबाई मोडक –शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.
गुजरातेतील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिल्या भारतीय प्राचार्या होत्या. बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे. (जन्म: १९ एप्रिल १८९२)