१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव –ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
१९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
१९७३: बॅटल ऑफ सेक्सेस –स्टन, टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरूषाचा लॉन टेनिस मधे पराभव केला.
१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.
जन्मदिवस / वाढदिवस
१८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा). (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०)
१८९८ : नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर – सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,
स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील
सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. निरोप घेता हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)
१९०९: गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर.
१९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा (मृत्यू: २ जून १९९०)
१९१३: कवी वा. रा. कांत.
१९२१: क्रिकेटपटू पनानमल पंजाबी.
१९२२: द. न. गोखले –चरित्र वाङ्मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.
१९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)
१९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) (मृत्यू: ९ जून १९४६)
१९३४: इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन.
१९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी . (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)
१९४४: क्रिकेटपटू रमेश सक्सेना .
१९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू .
१९४९: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट.
१९०९: गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर –गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष,
गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)
मृत्यू / पुण्यतिथी
१८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर .
१९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)
१९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू.
१९३३: अॅनी बेझंट –थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते.
त्यांनी भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी होमरुल लीगची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७)
१९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा.
१९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया .
१९९७: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ – खांडवा, मध्य प्रदेश)
२०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया . (जन्म: ३० मे १९४०)