१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.
१९३४: प्रभातच्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून
प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.
प्रभातचाच अमृतमंथन हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता. यानंतर कराड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, मद्रास
अशा अनेक ठिकाणी प्रभात नावाची चित्रपटगृहे निघाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.
१९६४: माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
१९६५: गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९६८: रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
१९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९७६: सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९८१: बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
१९८४: ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९९१: आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.
२०१३: केन्याच्या नैरोबी शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी वेस्टगेट मॉलवर हल्ला करून ७२ पेक्षा
अधिक लोकांना ठार केले. सुमारे १७५ जखमी.

१७४३: जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग . (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)
१९८२: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे. (जन्म: २१ जून १९२३)
१९९२: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या . (जन्म: १० मे १९१४)
१९९८: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर . (जन्म: २१ डिसेंबर १९५९)
२०१२: पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी . (जन्म: १७ डिसेंबर १९२४)