१८२९: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.
१९१६: जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.
१९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
१९४१: दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
१९६३: बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.
१९९१: हैतीमध्ये लष्करी उठाव.
२००८: लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला.
ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट होती.
२०१२: अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले.