१३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.
१८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.
१८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.
१८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
१९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
१९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
१९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.
१९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
१९९३: किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.
१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.
१९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.
२०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.
२०१५: सीरियाला पाठिंब्या साठी आयसिसच्या ठिकाणांवर रशियाने सीरियात हवाई हल्ले केले.
२०१७: सत्यपाल मलिक यांची बिहार राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती