१६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.
१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले.
१९३२: इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.
१९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.
१९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
१९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.
२०१३: लिबियातून निघालेल्या निर्वासितांची बोट इटलीजवळ बुडाली, १३४ मृत्यूमुखी.
२०१५: अफ़ग़ानिस्तानच्या डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स (एमएसएफ़) ह्या हॉस्पिटलवर अमेरिकी हवाई हल्ला. १९ लोकांचा मृत्यू.