जन्मदिवस / वाढदिवस
१८९०: किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला –तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते हरिजनचे संपादक होते.
१९२२: यदुनाथ दत्तात्रय थत्ते –पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार ,साधना मासिकाचे संपादक (मृत्यू: १० मे १९९८)
१९२२: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी . (मृत्यू: २६ एप्रिल १९८७)
१९२३: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्र. (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२)
१९३२: भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे.
१९३६: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वक्लाव हेवल . (मृत्यू: १८ डिसेंबर २०११)
१९३९: वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक वॉल्टर वुल्फ .
१९६४: भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी.
१९७५: ब्रिटीश अभिनेत्री केट विन्स्लेट.
मृत्यू / पुण्यतिथी
१९२७: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर . (जन्म: १० ऑगस्ट १८८७)
१९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)
१९८१:भगवतीचरण वर्मा –हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)
१९८३: टपरवेअर चे संशोधक अर्ल टपर . (जन्म: २८ जुलै १९०७)
१९९०: राजकुमार वर्मा –नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३). त्यांचे वीर हमीद, निशीथ, चितोड की चिता इ.
काव्यसंग्रह, एकलव्य हे खंडकाव्य, पृथ्वीराज की आँखे, रेशमी टाई, सप्तकिरण, शिवाजी इ. एकांकिका संग्रह व नाटके प्रसिद्ध आहेत. (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)
१९९१: रामनाथ गोएंका –इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (जन्म: ३ एप्रिल १९०४)
१९९२: बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत –नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
१९९७: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)
२०११: अॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज. (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)