१८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
१९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
१९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
१९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
१९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे
सुवर्णजयंती फेलोशिप जाहीर.
२०१५: हिन्दू कुश मधे भूकंप ,३०० हून अधिक लोकांचा मृत्यू.
२०१५:अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला इंडोनेशियात पकडले.
१९०९: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी . (जन्म: १६ ऑक्टोबर १८४१)
१९३०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन . (जन्म: १५ मार्च १८६०)
१९७९: चंदूलाल नगीनदास वकील –अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली.
१९९१: अनंत काशिनाथ भालेराव –स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)
१९९९: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन . (जन्म: १७ डिसेंबर १९१०)