जागतिक दयाळूपणा दिन
महत्त्वाच्या घटना
१८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.
१८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.
१९१३: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
१९२१: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
१९३१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
१९४७: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.
१९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील
सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
१९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
२०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
२०१४: भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा ने एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय मॅच मधे एका इंनिंगमधे २६४ रन करून किर्तीमान स्थापित केले.
२०१५: पॅरीस मध्ये आतंकवादी हल्ल्यात १२८ लोकांचा मृत्यू,राष्ट्रीय आपत्ती घोषीत.
२०१५: तामिळनाडूत पावसाच्या तडाख्यात ५५ लोकांचा मृत्यू.
जन्मदिवस / वाढदिवस
१७८०: शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग . (मृत्यू: २७ जून १८३९)
१८५०: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन. (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)
१८५५: गोविंद बल्लाळ देवल –आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ.
अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (मृत्यू: १४ जून १९१६)
१८७३: कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर . (मृत्यू: १० मार्च १९५९)
१८९८: पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९६९)
१९१७: वसंतदादा पाटील –महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (मृत्यू: १ मार्च १९८९)
१९१७: गजानन माधव मुक्तिबोध –हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)
१९५४: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली.
१९६७: अभिनेत्री जूही चावला .
१७४०: कृष्णदयार्णव –प्राचीन मराठी कवी. त्यांचा हरिवरदा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. (जन्म: १६७४)
१९५६: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ –मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल)
२००१: अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी –ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्या लेखिका.
दुर्दैवाशी दोन हात या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)
२००२: नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश साहा यांचे निधन.