कांदा भजी
साहित्य –
लांब चिरलेला कांदा 2 वाटया
बेसन अर्धी वाटी
काॅर्नस्टार्च 4 चमचे
लसूण पेस्ट 2 चमचे
चिरलेला कोथिंबीर 4 चमचे
जीरे 1 चमचा
हळद पाव चमचा
तिखट, मीठ चवीनुसार
कृती –
बेसन व काॅर्नस्टार्च सोडून सर्व साहित्य एकत्र करा. दही मिनिटानंतर त्यामध्ये जेवढे बेसन व काॅर्नस्टार्च मावेल तेवढे व थोडा पाण्याचा शिबका मारुन तेलात भजी तळून घ्या.
बटाटा भजी
साहित्य –
बेसन 2 वाटया
काॅर्नस्टार्च 3 चमचे
बटाटे चिप्स 1 वाटी
हळद पाव चमचा
लसूण पेस्ट 2 चमचे
मीठ, तिखट चवीनुसार
कृती –
बटाटे सोडून सर्व साहित्य एकत्र करा. नंतर या मिश्रणात बटाटयाचे चिप्स बुडवून तळून घ्या.
काकडीची भजी
साहित्य –
बेसन 2 वाटया
काॅर्नस्टार्च 3 चमचे
काकडीचे चिप्स 1 वाटी
हळद पाव चमचा
लसूण पेस्ट 2 चमचे
मीठ, तिखट चवीनुसार
कृती –
काकडीचे चिप्स सोडून सर्व साहित्य एकत्र करा. नंतर या मिश्रणात काकडीचे चिप्स बुडवून तळून घ्या.
कणकेचे थालीपीठ
साहित्य:-
बारीक चिरलेला कांदा 2 वाटया
दही पाव वाटी
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
कोथिंबीर –
मीठ चवीनुसार
कणीक 3 वाटया
तेल 4 चमचे
कृती:-
दोन वाटया कांदा बारीक चिरुन त्यामध्ये थोडे दही, हळद, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व यामध्ये मावेल ऐवढी कणीक घालून मिश्रण एकत्र भिजवा. साधारण दोस्याच्या पीठापेक्षा मिश्रण घट्ट व्हायला हवे. नंतर यातला एक गोळा घेवून तव्यावर ठेवून पसरवा, मध-मधे छिद्र पाडा व त्यामध्ये किंवा आजूबाजूला तेल सोडून झाकण ठेवा. मंद आचेवर थालीपीठ छान शिजवून घ्या. दोन्ही बाजूंनी परतून खायला दया.
बटाटेवडा
साहित्य:-
उकडलेले बटाटे 2 नग
मोहरी 1 चमचा
हिंग चिमुटभर
मीठ, हळद चवीनुसार
साखर चवीनुसार
आलं, लसूण, मिरची पेस्ट 1 चमचा
बेसन 1 वाटी
काॅर्नस्टार्च 3 चमचे
तेल 2 चमचे
कृती:-
सर्व प्रथम तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग हळद, घालून फोडणी करा. नंतर त्यात हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घाला. नंतर उकडलेला बटाटा कुस्करुन टाका. नंतर त्यावर कोथिंबीर घाला. नंतर चवीप्रमाणे मीठ, लिंबू, साखर घालून मध्यम आकाराचे गोळे ठेऊन बाजूला ठेवणे. बेसन व काॅर्नस्टार्च एकत्र करुन त्याचे बॅटर तयार करा. नंतर तयार केलेले बटाटयाचे गोळे त्यात बुडवून डीपफ्राय करा.
उकडपेंढी
साहित्य:-
कणीक 2 वाटया
मोहरी 1 चमचा
चिरलेला लसूण 1 चमचा
हिरवी मिरची 4-5
चिरलेला कांदा अर्धी वाटी
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
आमचूर अर्धा चमचा
मीठ, साखर चवीनुसाकोथिंबीर –
कृती:-
साधारण 2 वाटया कणकेची उकडपेंढी 6-7 लोकांना पुरेल. कढईत तेल तापल्यावर त्यामधे मोहरी, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची व कांदा घालून चांगले परता. नंतर त्यात हळद, तिखट व कणिक, थोडेसे आमचूर, मीठ, साखर घालून खमंग होईस्तोवर परतून गरम पाणी घाला एक वाफ येवू दया. नंतर कोथिंबीर घालून सव्र्ह करा.
सांजा
साहित्य –
रवा 2 वाटया
दही अर्धी वाटी
हळद, हिंग, चवीनुसार
मोहरी 1 चमचा
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
हिरवी मिरची 3-4
चिरलेला लसूण 1 चमचा
कोथिंबीर –
मीठ, साखर चवीनुसार
कृती –
सर्वप्रथम रवा भाजून घ्या. त्यानंतर चिरलेला कांदा फोडणीला घालून त्यात हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण चांगला परतून त्यात भाजलेला रवा, हळद, हिंग, दही, मीठ, साखर घालून दोन वाटया गरम पाणी ओता. थोडा वेळ झाकून कोथिंबीर घालून खायला दया.
पनीर खिचडी
साहित्य:-
बारीक कापलेले पनीर 1 वाटी
दाण्याचे कुट अर्धी वाटी
हिरवी मिरची 3-4
कोथिंबीर 4 चमचे
मिठ, लिंबू, साखर चवीनुसार
तेल 4 चमचे
कृती:-
फ्रायपॅन मध्ये तेल गरम करुन प्रथम जीरं, हिरवी मिरची, त्यानंतर पनीर टाकून परतून घ्यावे. त्यानंतर त्यात दाण्याचा कुट व उरलेले साहित्य टाकून परतून थोडी वाफ आणून खायला द्यावे.
टीप:- हा खिचडी प्रकार शोधण्या मागचं कारण हे की, खिचडी करायचं म्हटलं की साबुदाणा 2-3 तास आगादेर भिजवावा लागतं व तो कधी-कधी चिकट होतो त्यामुळे खिचडी चांगली लागत नाही. याचबरोबर साबुदाण्यापेक्षा पनीर मध्ये कितीतरी पौष्टिक तत्वे आहेत.
कोथिंबीर वडी
साहित्य –
कोथिंबीर 2 वाटया
आलं-लसूण 2 चमचे
मीठ, साखर चवीनुसार
आमचूर पावडर 1 चमचा
हिंग, हळद पाव-पाव चमचा
बेसन 3 वाटया
कृती –
सर्वप्रथम आलं-लसूण पेस्ट फोडणीला घालून त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आमचूर पावडर, साखर, हिंग घालून परतून घ्या. नंतर यात चिरलेली कोथिंबीर थोडे परतल्यावर त्यामध्ये 4 वाटया पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यावर बेसनाची पेस्ट घाला. नंतर एकत्र करुन थोडी वाफ आल्यावर हे मिश्रण एका ट्रेमध्ये थापून थंड करा. नंतर त्याच्या वडया पाडून तळून खायला दया.
चकली
साहित्य –
चकलीची भाजणी 2 वाटया
किसलेले कांदे 1 वाटी
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
दही पाव वाटी
लसूण 1 चमचा
कोथिंबीर –
कृती –
किसलेल्या कांदयात सर्व मसाले घालून मावेल तेवढी भाजणी घालून मिश्रण भिजवा. शक्यतो वरु पाणी घालू नका. हे मिश्रण चकलीच्या साच्यात भरुन चकल्या पाडून तेलात तळून घ्या.