राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आज एक पाऊल पुढे टाकत ‘नाम’ फाउंडेशन या संस्थेची . त्यामुळे नाना-मस्थापना केली आहे.मकरंदच्या सामाजिक कार्याला पाठबळ देऊ इच्छिणाऱ्या मंडळींना हक्काचं व्यासपीठच उपलब्ध झालं आहे.
‘नाम’च्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून, गेल्या काही वर्षांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार आपण देऊ शकू. त्याशिवाय, दुष्काळी भागात कायमस्वरुपी रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठीही सगळ्यांची मदत होईल.
या संस्थेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे असे विविध उपक्रम ही संस्था राबवते. या संस्थेने धोंदलगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) आणि आमला (जि. वर्धा) ही गावे दत्तक घेतली आहेत. [५] फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील तरुणांना आणि महिलांना रोजगार देण्यासही संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे संस्थेची कार्यालये आहेत.[४]