महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे, सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे.
भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये:
- विदर्भ – (नागपूर विभाग आणि अमरावती विभाग) : हे विभाग पूर्वी ब्रिटिश भारतातील मध्य प्रांतात -CP & Berarमध्ये-समाविष्ट होते.)
- मराठवाडा – (औरंगाबाद विभाग)
- खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग : यांत नाशिक विभागाचा समावेश होतो.
- कोकण – (कोकण विभाग)
- पश्चिम महाराष्ट्र – (पुणे विभाग)
यात पालघर जिल्ह्याचा समावेश नाही.
विभागाचे नाव (मुख्यालय) |
क्षेत्र | जिल्हे | मोठे शहर |
---|---|---|---|
अमरावती विभाग (मु:अमरावती) |
विदर्भ | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम | अमरावती |
औरंगाबाद विभाग (मु:औरंगाबाद) |
मराठवाडा | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी | औरंगाबाद |
कोकण विभाग (मु: मुंबई) |
कोकण | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी((सिंधदुर्ग)) | मुंबई |
नागपूर विभाग (मु: नागपूर) |
विदर्भ | नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली | नागपूर |
नाशिक विभाग (मु: नाशिक) |
खानदेश | नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर | नाशिक |
पुणे विभाग (मु: पुणे) |
पश्चिम महाराष्ट्र | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर | पुणे |