माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टीळा,
हिच्या संगाने जागल्या, द-याखो-यातील शिळा।
असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी भाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली.
“रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी,
चारी वर्णांतुनी फिरे,सरस्वतीची पालखी”
असं कवी कुसुमाग्रजांनी म्हंटलय.
आज जगभरात शेकडो मराठी मंडळं ही सरस्वतीची पालखी मोठ्या डौलाने मिरवत आहेत.
“मराठी ग्लोबल व्हिलेजची “संकल्पना खरं तर त्या अभ्यासाअंतर्गतच सुचली.
“आंतरजालात (Internet)डोकावलं, जगभरातील विविध देशांची नावे Internet मध्ये टाकून मराठी मंडळे शोधण्याचा कसून प्रयत्न केला आणि मराठी मंडळांचा मोठ्ठा खजिनाच हाती लागला!”
जगातील प्रत्येक छोट्या मोठ्या मंडळांचा अभ्यास केला तर त्यांची मराठी संस्कृती जपण्याची धडपड तोंडात बोटे घालणारी आहे.कविता,गाणी,कथाकथन,रंगमंच,संगीत,नृत्य,नाटकांना नवा साज चढवण्याचे कार्य,तसच आजच्या पिढीला मराठीशी जोडून ठेवण्याची जबाबदारी इथल्या मराठी बहाद्दरांनी हाती घेतली आहे. ह्या अमृततुल्य भाषेचा ओघ जगभरातील मंडळींनी वाड्मय रुपी गंगा त्यात सोडून विस्तीर्ण केलाय. अनेक दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल इथे वर्षभर असते. परदेशातही गुढय़ा उभारल्या जाताहेत,दिवे लावले जाताहेत. आपल्या मराठीपणाच्या खुणा आत्मीयतेने जपल्या जात आहेत. मराठी बाणा असलेलं ढोल ताषा पथक तर प्रत्येक देशात कार्यक्रमाची शान वाढवतं. सणवार,महिलांचे हळदीकुंकवाचे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असतात. महाराष्ट्रातून अनेक युवक निरनिराळ्या कारणासाठी परदेशात जातात, काही तिथे स्थायिक देखील होतात परंतु मायबोलीची आठवण त्यांना सोडत नाही. यावर उपाय म्हणून अतिशय प्रयत्न करून अनेक मराठी संस्थांची स्थापना झालेली आहे. या संस्थांद्वारे आता मराठी शाळांची सुद्धा निर्मिती झाली आहे. मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते. आजची हीच मुले उद्याच्या मराठीचं भविष्य आहेत हे ओळखून इथले पालक मुलांना मराठी शिकवायला शाळेत पाठवतात. ही “शाळा’ आठवड्याच्या शेवटी (वीक एन्डला) भरवली जाते. मुलांना मातृभाषेवर व बोलीभाषेवर प्रेम करायला शिकवा तिला पावन करा हाच तर कुसुमाग्रजांचा अट्टाहास होता नं.
या संस्थांद्वारे परदेशात मराठी भाषिक संमेलने सुद्धा भरवण्यात येतात. रशिया, ऑस्ट्रेलिया,अमेरिका, लंडनसह अनेक देशांमध्ये मराठी रेडीओ केंद्रे आहेत. त्यावर आजही मराठीतून कार्यक्रम सादर होतात. आजही कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय ही मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात. अनेक उत्कृष्ट दर्जाची नाटकं, चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित होत आहेत.दिवाळी अंक, दर महिन्याला मराठीत मासिके,वृत्त पत्रे प्रकाशित होत आहेत यामुळेच मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार जाउन तिचे महत्त्व दशपटीने वाढलेले आहे.
‘माझीया मराठीचिये बोलु कवतिके, अमृता तेही पैजा जिंके!”, हीच परिस्थिती.
“जगभरातील शेकडो मराठी मंडळांचा हा खजिना” पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय रहाणार नाही. कुसुमाग्रजांना या पेक्षा दुसरी आदरांजली ठरूच शकत नाही.
जागतिक महाराष्ट्र मंडळे :-
महाराष्ट्र मंडळे- आशिया – Maharashtra Mandal offices in Asia
http://marathiglobalvillage.com/maharashtra-mandal-offices-in-asia/
महाराष्ट्र मंडळे- आखाती देश – Maharashtra Mandal offices in UAE, Middle East
http://marathiglobalvillage.com/maharashtra-mand…n-uaemiddle-east/
महाराष्ट्र मंडळे- आफ्रिका-Maharashtra Mandal offices in Africa
http://marathiglobalvillage.com/maharashtra-mand…ffices-in-africa/
महाराष्ट्र मंडळे- ऑस्ट्रेलिया-Maharashtra Mandal offices in Australia
http://marathiglobalvillage.com/maharashtra-mand…ces-in-australia/
महाराष्ट्र मंडळे-युरोप-Maharashtra Mandal Offices in Europe
http://marathiglobalvillage.com/maharashtra-mand…ffices-in-europe/
महाराष्ट्र मंडळे- उत्तर अमेरिका-Maharashtra Mandal offices of North America
http://marathiglobalvillage.com/maharashtra-mand…of-north-america/
(ब-याच दिवसांच्या अभ्यासानंतर ही मंडळं internet वरून शोधली. ह्या शिवायही मंडळं असतील पण अनवघानाने त्यांचे नाव ह्या यादीत नसेल तर कृपया ती माहिती आपण Marathiglobalvillage @gmail.com वर पाठवावी, धन्यवाद)
आजच्या या पुण्यदिनी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे “अमृताशीही पैजा जिंकणार्या” आपल्या माय मराठीचे आणि संस्कृतीचे कौतुक करतानाच तिला दिवसेंदिवस वाढीस लावण्याची मनोमन प्रतिज्ञा घेऊयात….
Please Subscribe website –