चिंतन

माणसाचे जीवन सुखी आणि सम्रुध्द होण्यासाठी फक्त ८ गुणांची आवश्यकता असते. आता हे ८ गुण आपण बघू या.

बुध्दी-

चांगले किम्वा वाईट हे विचार करण्याची शक्ती ही फक्त मनुष्य प्राण्याला  दिली आहे. त्याचा पुरेपूर वापर करणे अथवा आपल्यात आणि पशुत काय तो फरक?

 सुंदर चरित्र –

अमिताभ बच्चन सगळ्यान्नाच आवडतो कारण त्याचे सद्गुण, शिस्त आणि सुंदर चरित्र यामुळेच. जर आपल्या चारित्र्यावर जराही ओरखडा पडला तर, कितीही हुशारी, पैसा असला तरीही त्याला समाजात मान्यता मिळत नाही. अशी  अनेक उदाहरणे आपल्या आजुबाजुला दिसत असतात.

 आत्मनियंत्रण –

self control हा अतिशय महत्वाचा आहे. योग्य अयोग्यतेचा विचार करुन काय बोलावे, कसे वागावे, त्याचे परिणाम याचा विचार आत्मनियंत्रणानेच होतो.

शास्त्र अध्ययन-

आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत किंवा करणार आहोत याचा सखोल अभ्यास महत्वाचा ठरतो.मग ते कुठेलेही क्षेत्र असो.  उदा. शिक्षकाने पूर्ण तयारी नसताना lecture घेतल्यास , किंवा विद्यार्थ्यान्ने पूर्ण तयारीनिशी परीक्षेला बसल्यास फजिती ही ठरलेली.

साहस –

बर्याच मुलान्ना stage fear असते. परंतु कधी तरी हे साहस करुन तर बघा. वीर सावरकरान्नी अंदमानचा संपूर्ण सागर पोहून आपले साध्य गाठले ते साहस केल्यामुळेच ना.

मीतभाषिता-

वायफळ बडबड नेहमीच टाळावी. माझ्या बोलण्याचा समोरच्यावर काही उपयोग होतो आहे का, किंवा माझ्या बोलण्याची गरज आहे का, किंवा माझ्या शब्दान्ना वजन आहे का हा विचार करुनच बोलावे. अन्यथा सततची वायफळ बडबड समोरचा niglect करतो. आणि आपली उर्जा पण उगाचच वाया जाते.

यथाशक्ती दान-

दान हे फक्त पैश्याच्या रुपातच असते असे नाही. माझ्याकडे जर कला असेल तर मी कलादान करु शकते /शकतो. माझ्याकडे जर ज्ञान असेल तर ते दान करु शकते/ शकतो. म्हणजेच माझ्यातील चांगल्या गोष्टी मी समोरच्याला दान करु शकते/शकतो, मग ती छोटीशी का होईना.

 क्रुतज्ञता-

ज्याने आपल्याला मदत केली, त्याच्याप्रती कायम क्रुतज्ञ रहावे.
हे ८ गुण माणसाचे आयुष्य सुशोभित आणि सम्रुध्द करते.

वैशाली कविश्वर

लेखिका,प्राध्यापिका,रुईया कॉलेज,मुंबई(विज्ञान)