रत्ने

रत्न धारण करताना तज्ञांच्या सल्यानेच रत्न वापरावे. मार्गदर्शनाशिवाय  वापर करू नये….

पोवळे

पोवळे हे उष्ण गुणधर्माचे पुरूष रत्न आहे.हे जैविक रत्न आहे.लहान मुलांच्या गळयात पोवळयाची माळ

घातली असता पोटात दुखणे,मुडदुसपासून संरक्षण मिळते.प्रवाळ अंजनामुळे डोळयांचे विकार होत नाही व

दृष्टी तेजस्वी बनते.वात,पित्त,कफ,आम्लपित्त,वायुविकार ही नष्ट होतात.

खरे पोवळे:-

आयग्लासमधून पाहिले असता ख- या रत्नांवर लहान लहान रत्नकण दिसतात.खोट्या प्रवाळांवर रत्नकणांचा अभाव असतो.मात्र कोणत्याही परिस्थितीत डागाळलेले,मळकट,पांढरे कण दिसणारे,छिद्र असलेले,दुरंगी किंवा खड्डे असलेले पोवळे घेऊ नये.हे पोवळे दोषयुक्त समजले जातात.

सर्वसाधारणपणे:- १. मंगळ अस्तंगत रविबरोबर असेल तर

२. मिथुन,कन्या राशीत मंगळ शुभयोगात असेल तर

३. पत्रिकेत मंगळ १२ व्या ,पहिल्या,चौथ्या,सातव्या,आठव्या स्थानात असेल तर

४. वृश्चिक,मेष,मकर राशीत मंगळ उच्चीचा असेल तर

५. लग्नेशाच्या शुभयोगात मंगळ असेल तर किंवा रवि,गुरू,बुध,चंद्र यांच्या नवपंचमात मंगळ असेल तर पोवळे वापरणे फायदेशीर ठरतो.

रंगाची चिकित्सा केली असता,म्हणजे लोलकातून पोवळयाचे निरिक्षण केले असता त्याचा रंग पिवळा दिसतो. तोच त्याचा खरा रंग असतो.

स्वास्थ बिघडण्यापूर्वी या रत्नाच्या रंगात फरक पडतो आणि प्रकृती चांगली झाली असता त्याला  पुन्हा मूळ रंग प्राप्त होतेा.

पोवळे मंगळवारी दुपारी एक वाजल्यानंतर चांदी,तांबे,पंचधातूत जडवून उजव्या हाताच्या अनामिकेत धारण करावे.

गोमेद

 गोमेद हे राहूचे रत्न आहे. राहूच्या दुष्प्रभावापासून वाचवतो. लोक जन संपर्क सुधारतो. अचानक

उद्भवणार्‍या समस्या कमी होतात. नेतृत्व गुणासाठी योग्य. नकारात्मक उर्जाचे रक्षण करतो. काळी जादू पासून

वाचवतो.

लसण्या

लसण्या हे केतूचे रत्न आहे.हितशत्रूंपासून वाचवते. लसण्या हा अतिउष्ण गटात मोडतो.अध्यात्म व

गुढविद्यांचे आकर्षण निर्माण करतो.कालसर्पयोग,रवि-राहू,रवि-केतू,चंद्र-राहू,चंद्र-केतू यापैकी एक जरी

ग्रहयोग कुंडलीत असेल तर हे रत्न सल्यानेच उपाय करूनच धारण करावे..अनाकलणीय धोके यापासून रक्षण करते.

मोती

मोती हा चंद्राचं प्रतिनिधित्व करतो.वायुतत्वाचा हा खडा भाग्यरत्न म्हणून वापरला जातो.हा

शीतगुणधर्माचा असतो.ज्या व्यक्तींना साडेसातीचा त्रास आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेत जन्मतः साडेसाती आहे

त्यांनी मोती कायम वापरावा.मोती हा मनाचा कारक आहे.मासिकपाळीच्या तक्रारी,मूत्राशय,ब्लडप्रेशर या

आजारांवर काम करतो.

 

निलम

निलम  हे शनीचे रत्न आहे. हे रत्न अतिशय शक्तीशाली असते. गेलेली संपत्ती पुन्हा मिळवण्याच्या साठी,

प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी, वाईटांपासून रक्षणासाठी योग्य. मानसिक व अध्यात्मिक उन्नती करता वापरतात.

निलम रत्न धारण करताना मार्गदर्शनाशिवाय याचा वापर करू नये. कारण तो आपल्याला अनुकूल नसेल तर तो

आपल्याला कंगाल करू शकतो. अपघात, संकटे ओढवू शकतात.

पाचू

पाचू हे रत्न बुधाच्या अमलाखाली येते.पाचू रत्न संजीवकाचे काम करतो.स्मरणशक्ती

वाढवतो.उत्साह,प्रेरणा देतो.मज्जासंस्था उत्तेजीत करतो.सामाजिक क्षेत्रात,कम्युनिकेशन

क्षेत्रात,पत्रकार,वकीली क्षेत्रात याचा प्रभावी वापर केला जातो.लोकप्रियता वाढवतो.चैतन्यलहरी निर्माण

करतो. नैराश्य दूर करते.

माणिक

माणिक हे सूर्याचे रविरत्न आहे.माणिक दुःख,चिंता मिटवतो.विलास-वैभवातून येणारे कुप्रभावही नष्ट

करतो.पूत्रप्राप्ती,आरोग्य ,स्त्रीआरोग्य यासाठी माणिक प्रभावी काम करतो.माणिक आपल्याला मानसन्मान,

किर्ती मिळवून देतो.दीर्घायुष्य प्राप्त होते.नेत्रविकार, रक्तविषयक आजार यामध्ये प्रभावशाली काम करतो. 

दीर्घकाळ आजारी असणा- या व्यक्तीच्या उशाशी पद्मराग ( प्रभावी माणिक) हे रत्न ठेवले असता शरीरातील रोगजंतू नष्ट करते.

माणिक रत्नाचे प्रकार:-

१. पद्मराग:- हे सर्वोच्च व श्रेष्ठ दर्जाचे माणिक सोन्याच्या तप्त रसाप्रमाणे तेजस्वी दिसते.सूर्यप्रकाशात त्यातून असंख्य किरणे परावर्तित होतात. हे रत्न कोमल व गुळगुळीत असते.

२. जामुनिया:- यातून जांभळा व लाल रंग दिसतो. हे कन्हेरीच्या फुलासारखे दिसते.

३:- सौगन्धिक माणिक:-डाळींबाच्या दाण्यासारखे हे माणिक चकोर पक्षांच्या डोळ्याच्या रंगाचा आभास निर्माण करते.

४. कुरविंद माणिक:- पद्मराग माणकासारखाच याचा रंग असतो.मात्र हे लहान आकारातच सापडते.

५. नीलगंधी माणिक:- कमलपुष्पाच्या रंगाचे हे रत्न निळसर झाकही दर्शविते.

( वरील रत्नांचे प्रकार हे अल्लाउद्दीन खिलजींचा कोषागार प्रमुख हक्कूर फैज याने नवरत्नांवर लिहिलेल्या ‘रत्नपरिक्षा’ ग्रंथात माणकाचे प्रकार सांगितले आहेत.)

ख- या- खोट्याची परिक्षा:-

१. नकली माणिक हे ख- या माणकापेक्षा जादा चमकदार दिसतात.

२. खरे माणिक डोळ्याच्या पापणीवर ठेवल्यास त्याचा स्पर्श थंड भासतो.

३. चांदीच्या भांड्यात काही मोती घेऊन त्यात माणिक ठेवून ते भांडे सूर्यप्रकाशात आणले तर सर्व मोत्यांवर लालसर झाक दिसली तर ते अस्सल समजावे.

४. गायीच्या दुधात माणिक टाकल्यास दुधावर गुलाबी रंगाची झाक दिसली तर ते अस्सल समजावे.

५. कृत्रिम माणिक रत्नातील चीर चमकदार दिसते तशी ख- या रत्नातील दिसणार नाही. ही चीर वेडीवाकडी असू शकते.मात्र कृत्रिम रत्नात ती सरळ रेषेत दिसेल.

६. खरे माणिक द्विवर्णी असते तर कृत्रिम माणिक कोणत्याही कोनातून एकाच रंगाचे दिसेल.

७. अंधारात कृत्रिम माणिक अधिक चमकेल,तर अस्सल माणिक उजेडात अधिक चमकतो.

८. बर्फाच्या एका तुकड्यावर खरे माणिक रत्न ठेवल्यास बर्फातून एक प्रकारचा मंद ध्वनी निघतो.कृत्रिम माणकाच्याबाबत असे घडत नाही.

माणिक रत्न रविवारी ,सूर्योदय झाल्यापासून एक तासापर्यंतच्या वेळात पंचधातूत अथवा सोन्यात जडवून उजव्या हाताच्या अनामिकेत धारण करावे.

आ कृष्णेन रजसा वर्तमाने निवेशषन्नमृतं मर्त्यच्या’’ हिरण्येन सविता रथेना देवो याती भुवनाम्नि पश्यन्’ हा मंत्र म्हणून ते धारण केल्यास शुभ मानले जाते.

 

पुष्कराज

पुष्कराज हे गुरूचे अनमोल रत्न आहे. मन:शांती देतो. सुखसमृध्दी देतो. शैक्षणिक क्षेत्रात हे रत्न प्रभावशाली

काम करते.  अध्यात्मात याचा वापर फायदेशीर ठरतो. यकृत, लिव्हरवर

,मधुमेह या आजारांवर या रत्नाचा उपयोग होतो.

 

संदर्भ-  रत्नशोध डॉट कॉम