दुध साग (कोल्हापूरी)
साहित्य
बटाटा 4-5 नग
बारीक चिरलेला कांदा 1 वाटी
टोमॅटो अर्धी वाटी
मोहरी 1 चमचा
खसखस 2 चमचे
ओलं खोबरं अर्धी वाटी
काळी मिरी अर्धा चमचा
लवंग अर्धा चमचा
विलायची अर्धा चमचा
जायफळ 1 नग
दूध 2 वाटया
मीठ चवीनुसार
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
कृती:-
सर्व प्रथम बटाटयाच्या काचÚया करुन घ्या. तेलात मोहरी फोडणीला घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व सर्व मसाले वाटून केलेली पूड घालून परतून घ्या. थोडे परतल्यावर त्यात बटाटे घालून ते सुद्धा परतून घ्या. नंतर वाटलेल ओलं खोबरं, खसखस व दूध घालून शिजवून घ्या. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून सव्र्ह करा.
कोल्हापुरी मिसळ पाव
साहित्य –
मोड आलेली मटकी 3 वाट्या
लाल मोठे कांदे 4 नग
ओले खोबरे 2 वाट्या
सुके खोबरे 1 वाटी
आल्याचा तुकडा 3 इंच
लसूण 1 गाठ
कोथिम्बीर अर्धी वाटी
कोल्हापुरी चटणी 2 चमचे
गरम मसाला 1 चमचा
चिरलेले बटाटे 2 नग
मीठ, हिंग, हळद, तिखट चवीनुसार
ब्रेड 2 नग
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
कोथिंबीर पाव वाटी
लिंबू 1 नग
फरसाण 2 चमचे
कृती –
पातेल्यात तेल तापवून त्यात हिंग, हळद घालावी. मटकी, बटाटे टाकून परतावे, बुडेल इतके पाणी, तिखट, मीठ घालून षिजवावे. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल. कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कांदे बाजूला ठेवून उरलेला कांदा खोबरे(दोन्ही), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटवा. आंलं, लसूण, कोथिंबीर बारीक वाटावी. वाटताना जास्त पाणी घालू नये. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून हिंग हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कांदा कोल्हापुरी चटणी टाकावी. परतल् यावर दोन्ही वाटण घालून पुन्हा चांगलेे परतावे. त्यात मीठ आणि 4 कप पाणी घालून उकळी आणावी. घेताना एका खोलगट प्लेट मधे 2 मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कांदा, कोथिंबीर घालून मग 1 पळी कट घालावा. कट घेताना ढवळून घ्यावा. लिंबू पिळून ब्रेड बरोबर खावे.
सुरमई फ्राय
साहित्य:-
सुरमई अर्धा किलो
कोल्हापुरी कांदामसाला 4 चमचे (किंवा लसूण खोबरं चटणी)
हळद अर्धा चमचा
तेल तळण्यासाठी
मीठ चवीनुसार
2 लिंबाचा रस –
कृती:-
सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ लावून 15-20 मिनिटे ठेवा. नंतर त्याला सुटलेले पाणी काढून टाका. फ्रायपॅनमधे तेल घेवून सुरमईच्या तुकडयांना कोल्हापुरी कांदामसाला लावून घ्या व फ्रायपॅमधे मसाला लावलेले सुरमईचे तुकडे घालून शॅलोफ्राय करा. दोन्ही बाजंूनी चांगले फ्राय झाल्यावर गॅस बंद करा. तयार फ्राय तुकडयांवर लिंबाचा रस आवडीनुसार चोळून घ्या.
कच्च्या तेलातले वांगे
साहित्य:-
मसाल्याची छोटी वांगी 5 ते 7
कोल्हाूपरी चटणी 5 चमचे
आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची चटणी 1 चमचा
मीठ चवीनुसार
शेंगदाणा तेल अर्धी वाटी
कृती:-
वांग्याला मध्ये चिर देवून मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. कोल्हापूरी चटणीमध्ये हिरवी चटणी व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण वांग्यांमध्ये भरावे. अशी भरलेली वांगी पातेल्यात ठेवून त्यावर कच्चे तेल घालावे. साधारण वांगी बुडतील इतपत वर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालावे व मंद आचेवर अंगच्याच पाण्याने शिजवावे. शिजल्यानंतर तांबडया व पांढÚया रश्श्याबरेाबर अशी सुकी वांगी सव्र्ह करावी.
टीप:- झाकणावर पाणी टाकून पदार्थात पाणी न घालता शिजवण्याची ही पद्धत पारंपारिक आहे. फक्त शिजवतांना थोडी काळजी घ्यावी. याची चव निश्चितच वेगळी लागते.
कारल्याची भाजी
साहित्य:-
कारली अर्धा किलो
शेंगदाणा कूट अर्धी वाटी
तीळ कूट अर्धी वाटी
सुक्या खोबÚयाचा जाड कूट अर्धी वाटी
कोल्हापूरी मटण मसाला 2 चमचे
चिंचेचा कोळ पाव वाटी
गूळ पाव वाटी
मीठ चवीनुसार
तेल –
फोडणीचं साहित्य –
कृती:-
फोडणीला तरा जास्तच तेल घ्यावं. हळद, हिंग, जिरे घातल्यावर जाडसर कुटलेले शेंगदाणे, तीळ, सुकं खोबरं घालावं. जरा परतून त्यात मीठ, चवीनुसार मसाला, चिंच गूळ घालावं. नंतर चिरलेली कारली घालून वाफ आणावी. तेल सुटलेलं भरपूर मसाला असलेलं कारलं भाकरीबरोबर छान लागतं.