रामनवमी –
रामनवमी हा चैत्र महिन्यातली शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा जन्म दिवस. श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन् लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगांत. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या – कौसल्या, सुमित्रा अन् कैकयी ह्यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली.
श्रीराम –
हे श्रीरामायण ह्या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक. श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय.
श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजाजनकाच्या मिथिलानगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला. भुमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.
ह्या आदर्श देवाताराची आपल्याला सदैव आठवण रहावी तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्य. रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इ. कार्यक्रम ही केले जातात. कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. – संकलक) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्ती होते, असे सांगितले आहे.
कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र) हे वस्त्र पाठीपर्यंत असते.वस्त्र घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो.` काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्ती होते, असे सांगितले आहे.
रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.
रामनवमी व्रत कसे करावे-
* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.
* दुसर्या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
* ‘उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||’ या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.
* त्यानंतर, ‘मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये’ हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.
* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.
* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.
रामनवमीच्या दिवशी काय करावे?
* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.
* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.
* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा.
* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
* दुसर्या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.
रामनवमी व्रताचे फळ
* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.