ऋतू आणि आहार

वर्षभरात एकूण सहा ऋतू असतात. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत.

या ऋतूंमध्ये बदल होत असतो. या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो.आयुर्वेदानूसार शरीरातील त्रिदोष यांच्यावरही ऋतूबदलाचा परिणाम होतो. शरीरातील स्थिती व सतत बदलती बाह्य स्थिती यात सुसंवाद निर्माण होणं गरजेचं असतं.

शिशिर ऋतू (डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी)

या ऋतूत थंडीचे प्रमाण जास्त असते. हेमंत ऋतूप्रमाणेच ठेवावा. उष्ण पदार्थ या काळात उपयुक्त ठरतात. उदा. गुळाची पोळी. सकाळी लवकर उठून सकाळच्या उन्हात बसून मुगाची खिचडी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत इत्यादी आहार घेतला जातो. या ऋतूत उष्ण अशा बाजरीचा वापर करायला हरकत नाही. बाजरीने रूक्षता येऊ नये म्हणून बाजरी + लोणी किंवा बाजरी + तीळ यांचा वापर करावा. या काळात मकरसंक्रांत असते. आपण तीळ + गुळांचा वापर करतो.

वसंत ऋतू (फेब्रुवारी, मार्च, एप्रिल)

ऋतुराज,वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. सुगंधी फुले येतात. या ऋतूत सूर्याच्या उष्णतेने कफाचे विलयन होते व कफप्रकोप होतो. यामुळे दमा, खोकला, सर्दी, ज्वर असे आजार होतात.
आहार: या ऋतूत भूक कमी लागते. व शरीर दुर्बलताही असते. त्यामुळे आहार पचायला हलका असावा. उदा. जुने धान्य, कडू, तिखट व तुरट चवीचे पदार्थ वापरावेत. भात कफकर असल्यामुळे त्याचे प्रमाण कमी ठेवावे. हरभरा तूर, मूग, मसूर या डाळी कफ कमी करणार्‍या असल्यामुळे वापरण्यात तांदुळ, पडवळ, वांगी, मुळा या भाज्या तसेच हिंग, मोहरी, आले, मिरची, दालचीनी, लसूण हे मसाला पदार्थ घ्यायला हरकत नाही. दही, तुप या ऋतूत घेऊ नये. तेल कफनाशक असल्याने ते वापरावे. पंख्याचा वारा टाळावा. दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणे टाळावे. व्यायाम हेमंत व शिशिर ऋतूपेक्षा निम्मा करावा.

ग्रीष्म ऋतू (एप्रिल, मे, जून)

ग्रीष्म ऋतूत शरीरात वाताचा संचय होण्याचा काळ असतो. याऋतूत वातावरण रूक्ष असते. यामुळे थकवा येतो व वात वाढतो. भूक कमी होत असल्यामुळे लघू व अल्प आहार घ्यावा. गोड, आंबट व खारट चवीचे पदार्थ घ्यावेत. भात, दूध, तुप आणि तेल भरपरू खावे. ताक, दही, श्रीखंड, बासूंदी, कैरी, आवहा, कोकम यांचे शरबत प्यावे. पालेभाज्या, कांदा, द्रव पदार्थ भरपूर घ्यावे. या ऋतूत डाळीचा वापर कमी करावा कारण रूक्षता वाढते. या ऋतूत बाजरी, लसूण हे पदार्थ खावू नयेत. वातवारणात उष्णता असल्याने स्नानासाठी गार पाणी वापरावे. या ऋतूत दिवसा झोप घ्यायला हरकत नाही. रात्री चांदण्यात, मोकळ्या वातावरणात झोपावे. रात्री झोपण्यापूर्वी म्हशीचे दूध अवश्य घ्यावे. वर सांगितल्याप्रमाणे ऋतूनुसार आहार विहार ठेवला तर आपण निरोगी, दीर्घायुषी होऊ शकतो.

वर्षाऋतू (जुन, जुलै, ऑगस्ट पुर्वार्ध)

वातावरणात उन्हामुळे आलेली रूक्षता व नंतर सततच्या पावसामुळे शीतलता येते. यामुळे या काळात वातदोष वाढतो. म्हणून भूक कमी होते व अशक्तपणा येतो. या ऋतूत वनस्पती लहान असतात व त्यामध्ये अम्लरस (आंबट चव) वाढते व त्यामुळे शरीरातही पित्त दोषाच्या संचयाला सुरूवात होते. वर्षा ऋतूमध्ये भूक कमी होत असल्यामुळे पचायला हलका आहार घ्यावा. उदा. दूधभात, मुगाचे वरण, हुलग्याचे पिठले, भाकरी असा हलका आहार घ्यावा. दही खाऊ नये. ताक घ्यायला हरकत नाही. ताक भूक वाढविण्यासाठी उत्तम. लसूण, हिंग, सुंठ, मिरे, जिरे, लिंबू, पुदीना, कोथिंबीर इत्यादी पदार्थ घ्यावयास हरकत नाही. पाणी उकळून गार करूनच प्यावे. भाज्या – दुधी भोपळा, दोडका, पडवळ, भेंडी खावे. तूप, तेल भरपूर वापरायला हरकत नाही. या ऋतूत वातप्रकोष होतो. यामुळे दुर्बलता येते. त्यामुळे अतिव्यायाम, साहस वर्ज्य करावे.

शरद ऋतू (ऑगस्ट उत्तरार्ध, सप्टेंबर, ऑक्टोबर)

या ऋतूत पित्त दोष वाढतो आणइ वात दोषाचे शमन होते. शरीरबल व अग्निबल हळूहळू वाढते.
पित्त कमी करणारा असावा म्हणजेच गोड, कडू व तुरट या तीन चवींचा आहार असावा. भात, ज्वारी, गहू, मूग, मटकी, हरबरा, मटार, भरपूर दूध व तूप, नारळ, कार्ल्याची, मेथीची भाजी हे पदार्थ खायला हरकत नाही. शरीराला गरम ठरणारे पदार्थ खारट, आंबट, लसूण, मसाल्याचे पदार्थ या ऋतूत खावू नये. दूध हे पित्त कमी करणारे असते. यामुळे या ऋतूत कोजागिरी पौर्णिमेला दूध चांदण्यात ठेवून पिणे आरोग्यदायी ठरते.
स्नानासाठी, पिण्यासाठी थंड पाणी वापरावे. या ऋतूत उकाडा खूप असतो म्हणून पोहण्याचा व्यायाम उपयुक्त ठरतो. शरीरावर चंदन, वाळा, कापूर इत्यादी शीतल द्रव्यांचा लेप लावावा.

हेमंत ऋतू (ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर)

या ऋतूत शरीराचे बल उत्कृष्ट असते. भूक वाढते. व्याधी प्रतिकारशक्ती वाढते.या ऋतूत पचावयास जड असा आहार व जास्त प्रमाणात धेतलेला आहर ही पचतो. या ऋतूत गोड, आंबट आणि खारट पदाथृ खावेत. गहू, उडीद, साखर, दुध, तेल, तुप भरपूर घ्यावे. तुर, मुग, मटकी, वाटाणा, हरभरा, चवळी घ्यावेत. दुधाचे सर्व पदार्थ आहारात असावेत. हेमंत ऋतूत रात्र मोठी असते व दिवस लहान असतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते, त्यामुळे पोटभर न्याहारी करावी.स्नान व पिण्यासाठी गरम पाणी वापरावे. भरपूर व्यायाम करावा. अभ्यंग, उटणे लावावे. नंतर स्नान करावे. या ऋतूत कार्तिक स्नानाला महत्व आहे. या ऋतूत दिवसा झोपणे टाळावे.

आहार

आपल्या आरोग्याशी निगडित बहुतांश व्याधींचं मूळ आहारामध्ये असतं. जर तुमचा आहार उत्तम असेल तर तुमचे आयुर्मान वाढू शकते हे उत्तर अमेरिकेत राहणार्‍या लोकांनी दाखवून दिले आहे. येथील लोकसंख्या सातत्याने वाढत असूनही येथील लोकांचे आयुर्मान 85 वर्षाच्या पुढे आहे. जपानमधील नागरिकांनीही हे सिद्ध केलं आहे. काय आहे हा आहारमंत्र?
जसजसे वय वाढत जाते तसतसे व्यक्तीला लागणार्‍या कँलरीज कमी होत जातात. 50 वर्षे असलेल्या व्यक्तीला 1800 कँलरीज रोज लागत असतील तर 70 व्या वर्षी त्याच माणसाला 1440 कॅलरीज एका दिवशी पुरेशा असतात. परंतु ज्या व्यक्ती आपल्या वयाप्रमाणे आपला आहार संतुलीत आणि कमी करत नाहीत त्यांना जास्त वजन, हृदयविकार, मधुमेह, संधीवात यासारखे आजार होउ शकतात.

वाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीला हाडांची होणारी झीज आणि संधीवात होउ नये म्हणून कँल्शियमची गरज असते. त्याचबरोबर कँल्शियम शोषून घेण्यासाठी व्हीटामीन डी लागते. व्हीटामीन बी 12 हे रक्तपेशी आणि मज्जातंतुचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी झींक चा उपयोग होतो. हाय ब्लडप्रेशर असणार्‍या व्यक्तींना पोटँशियमची गरज असते. फोलीक अँसिड आणि बी व्हीटामीनची गरज ह्रुदयविकार असलेल्याना जास्त असते. अर्थात या सर्व घटकांचे शोषण आहारातून नाही झाले तर अनेक विकार होउ शकतात.

संतुलीत आहार घेणे जितक गरजेचे आहे तितकेच आपण जेवताना आनंदी असणं महत्वाचं आहे. त्यासाठी शक्यतो कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र जेवण घेणे महत्वाचे आहे. फळे खरेदी करताना शक्यतो ती गडद रंगांची असावीत. दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.अनेक लोक हे टाळतात त्यामुळे त्यांना बध्दकोष्ठ होउ शकतो.जर दातांची अवस्था योग्य नसेल तर मऊ अन्न, पातळ पालेभाज्या खाव्यात. रोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. संतुलीत आहारबरोबरच आपल्या वयाप्रमाणे आहार थोडा कमी करावा. जड आहार घेउ नये. योग्य प्रमाणात संतुलीत आहार , रोज किमान अर्धा तास चालणे , जीवन जगण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर वाढत्या वयाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगताना “आरोग्यम धनसंपदा” याचा अनुभव येईल.

ओमेगा-3 फँटी अँसिडस रक्तवाहीन्याचे आरोग्य तसेच प्लेटलेटसचे प्रमाण योग्य ठेवतं त्यासाठी अळशी नियमित सेवन करणं गरजेचं आहे. जर आपलं वय 50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बी12 व्हीटँमिनची आपल्याला रक्तनिर्मितीसाठी जास्त गरज असते. माणसाच्या जठरामध्ये निर्माण हेाणार्‍या अँसिडमध्ये हे बी12 व्हीटँमिन असते. हे व्हीटँमिन आहारातून रक्तात शोषले जाते. परंतु जास्त वयाच्या व्यक्तीच्या जठरात हे अँसिड निर्माण होत नाही त्यामुळे हे व्हीटँमिन रक्तात शोषले जात नाही म्हणून ते तोंडावाटे गोळ्यांच्या स्वरुपात घ्यावे लागते, अर्थात तेही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे लागते.

वाढत्या वयाबरोबर योग्य , संतुलित आहाराबरोबरच ताणतणाव, हार्मोन्स, चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे महत्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या विचारात आणि आचारात थोडा लवचिकपणा आणायला हवा तसेच प्रत्येक सामाजिक ठिकाणी जेष्ठांचा विचार केला जावा.

वाढत्या तणावाने आणि स्पर्धेमुळे आजकाल 35 ते 40 व्या वर्षी मधुमेहासारखा आजार होउ शकतो. व्यायामाच्या अभावामुळे औषधे घेउनच त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. परंतु मधुमेह असणार्‍या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मधुमेह हा एक असा आजार आहे की जो हळूहळू आपली रोगप्रतिकारकशक्ती कमी करते, त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होउ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या आहारात साखरेचे प्रमाण कमी ठेवणे हितकारक ठरेल.

शरीराचे पालनपोषण करते ते अन्न. त्याचे घन (solid), द्रव (liquids) व अर्ध प्रवाही (semisolids) असे तीन प्रकार असतात. या अन्नघटकांचे योग्य प्रमाण आपले शरीर निरोगी राखते.पोषक अन्नघटक आपल्या शरीराला उपयुक्त असतात आणि शरीराचे कार्य नीट चालवायला ते मदत करतात. दररोजच्या जेवणातून शरीरात ते योग्य प्रमाणात गेले नाहीत तर आपले आरोग्य बिघडते. आहारातील काही घटक आपल्या शरीराला पोषण देत नाहीत.

शरीराचा सुदृढपणा हा संपूर्ण शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याशी निगडित असतो. आहाराचा आपल्या शरीराच्या सुदृढतेशी सर्वात जवळचा संबंध असल्याने त्याचे कार्यही या सर्व पातळ्यांवर चालते. अन्नाची काही महत्त्वाची कार्ये अशी-

शारीरिक कार्य

ही तीन प्रकारची असतात.
अ) शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे-

शरीराला अवयवांची हालचाल करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, इतकेच नव्हे तर हृदयाचे स्पंदन वा फुप्फुसाचे श्वासोच्छ्वासाचे काम पार पाडण्याकरितासुद्धा ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. पोषक पदार्थामधील कबरेदके आणि स्निग्ध पदार्थ यासाठी उपयोगी पडतात. थोडय़ा प्रमाणात प्रथिनांचाही ऊर्जा निर्मितीसाठी वापर होतो.

ब) शरीर बांधणीचे कार्य-

मानवी शरीर अनेक पेशींचे बनलेले असते. शरीराची वाढ होत असताना या पेशी आकाराने वाढतात तसेच नवीन पेशींची भरही त्यात पडत असते. या सर्व क्रियाप्रक्रियेत जीर्ण पेशींचा ऱ्हास होत असतो. रोजच्या चलनवलनादरम्यान, ताणतणावांमुळे दररोज असंख्य पेशी यादरम्यान कामी येत असतात. त्यांची जागा नवीन पेशींच्या सैन्याने भरून काढणे आवश्यक असते.यासाठी प्रथिने अत्यावश्यक असतात.

क) संरक्षण आणि नियमन

संरक्षक कामामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्याचे जंतूशी लढाई करणे, संसर्गापासून रक्षण करणे व शरीर तंदुरुस्त राहील याची काळजी घेणे, योग्य नियमन करणे म्हणजे शरीराच्या अनेक क्रिया उदा. हृदयाचे स्पंदन, स्नायूंचे आकुंचन, शरीराचे तापमान योग्य ठेवणे, रक्त गोठवणे, शरीरात पाण्याचा समतोल ठेवणे वगैरे क्रियांचा समावेश होतो. आवश्यक प्रमाणातील जीवनसत्वे, खनिजे व प्रथिने शरीराची ही कामे पार पाडतात.

संतुलित आहार म्हणजे जो आहार आपल्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करतो व शरीराचे काम उत्तम प्रकारे चालवायला मदत करतो. संतुलित आहारात विविध प्रकारच्या अन्नाचा समावेश असतो. तीन वेगवेगळ्या प्रकारचे अन्न त्याच्या कार्यानुसार प्रत्येक वेळच्या जेवणात निवडले जाते.

अन्नाचे वर्गीकरण असे

ऊर्जा देणारे अन्न – कबरेदके व स्निग्धता असलेले पदार्थ
कबरेदकांचे स्रोत- (धान्य) – तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी
कंदमुळे- बटाटे, रताळी, सुरण, साखर, गूळ, मध.
स्निग्धता असलेले स्रोत- साय, तूप, लोणी, तेल, वनस्पती तूप, चीज.
(दूध व दुग्धजन्य पदार्थ, तेल बिया व मांसाहारी पदार्थ. यामध्येही चरबीचे प्रमाण जास्त असते)
शरीर वाढीचे अन्न – प्रथिनयुक्त स्रोत जसे की दूध व दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, तेलबिया, मांसाहारी पदार्थ

संरक्षण व शरीर नियमन करणारे अन्न

१)अनेक जीवनसत्त्वे जसे अ, ब, क, ड, ई, के व खनिजांचे कॅल्शियम, फोस्फोरस, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज, तांबे, आयोडीन, सोडियम आणि पोटॅशियम यांचे स्रोत.
फळे – पिवळी व केशरी फळे – आंबा, पपई,
लिंबू वर्गातील आंबट फळे – संत्री, मोसंबी
इतर फळे – पेरू, केळी, नासपती, पीच, आलुबुखार वगैरे.
भाज्या – हिरव्या पालेभाज्या – पालक, मेथी, चौळी, माठ, शेपू ई.
पिवळ्या केशरी भाज्या – भोपळा, गाजर, टोमटो
इतर भाज्या – भेंडी, वांगी, फुलकोबी, पानकोबी, शेंगा, तोंडली ई

२) आहारामध्ये आणखी एक महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे फायबर (fibre). हा पिष्ठमय पदार्थच आहे. पण त्यांचे पचन होत नसल्यामुळे त्यांना नॉन अव्हेलेबल काबरेहाइड्रेट असे म्हणतात. आख्खी सालासकट फळे जसे सफरचंद, संत्रे, द्राक्षे, पेर, कलिंगड अंजीर इत्यादी. सालासकट धान्य, कडधान्य व भाज्या इत्यादी. सर्व पालेभाज्या, तोंडली, भेंडी, फ्लॉवर, कोबी, काकडी, टोमटो, गाजर यामध्येही फायबर असते. यातील काही प्रकारचे फायबर पोट भरल्याची भावना देतात ज्यामुळे भूक कमी लागून वजन कमी होण्यास फायदा होतो.काही प्रकारची फायबर्स मात्र पचनाच्या वेळेस पाणी शोषून घेतात व फुगतात. यामुळे पचनक्रियेचा वेग काही प्रमाणात वाढतो व मलप्रवृत्ती सुकर होण्यास मदत होते. दोन्ही प्रकारचे फायबर कमी-अधिक प्रमाणात वरील सर्व स्रोतांमध्ये आढळतात.

३) संतुलित आहारात पाण्याला फार महत्त्व आहे. आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. पाणी हे जसे पचनास मदत करते तसेच मलमूत्रविसर्जनासाठीही अतिशय उपयुक्त आहे. पाण्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. किमान दोन ते तीन लिटर पाण्याचा रोजच्या आहारामध्ये समावेश असावा. यामध्ये अर्थातच पाण्याबरोबर इतर द्रवपदार्थाचा जसे दूध, ज्यूस, नारळ पाणी, लिंबू पाणी, चहा, कॉफी, चहा असू शकतो.

४) शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पूर्ण दिवसात पोळी, भात, आमटी, विविध भाज्या, कोशिंबिरी, दूध, फळे या सगळ्यांचा समावेश हवा.
संतुलित आहार शरीराच्या पोषक गरजा भागवतो. कारण त्यात अन्न योग्य प्रमाणात सुचवलेले असते. जो आहार सांगितला जातो त्यात प्रत्येकाच्या शरीराच्या पोषक गरजेचा विचार केलेला असतो. त्यासाठी आहारतज्ञाचा सल्ला घेणं श्रेयस्कर.

“इलाजापेक्षा प्रतिबंध बरा,” अशी एक म्हण आहे; म्हणजे आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी. काही आजार आपण टाळू शकत नसलो तरी खबरदारी घेण्याद्वारे काही प्रमाणात आपण ते पुढं ढकलू शकतो. निरोगी राहण्यासाठी पुढं सुचवलेल्या पाच गोष्टींचा विचार करा.

१) स्वच्छ राहण्याची सवय लावा
२) स्वच्छ पाणी वापरा
३) तुम्ही काय खाता त्याकडे लक्ष द्या
४) व्यायाम करा

तुमचं वय कितीही असलं तरी, सुयोग्य बांधा टिकवण्यासाठी व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं बरेच फायदेही होतात.
चांगली झोप लागते.चालू-फिरू शकतो.हाडं आणि स्नायू मजबूत राहतात.वजन प्रमाणात राहतं.डिप्रेशनची किंवा नैराश्याची शक्यता कमी होते.अकाली मृत्यूचा धोका टळतो.
तुम्ही जर व्यायाम केला नाही तर,हृदयविकार होऊ शकतो,टाईप २ डायबिटीज होऊ शकतो,उच्च रक्तदाब होऊ शकतो,कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं,पॅरालिसिसचा किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो.
तुमच्या वयानुसार आणि आरोग्यानुसार तुम्ही व्यायाम केला पाहिजे. त्यामुळं कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्याआधी तुमच्या डॉक्टरांना भेटा. विविध आरोग्यविषयक सल्ल्यानुसार, मुलांनी व किशोरवयीनांनी दररोज एक तास हलका ते जोरदार व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. प्रौढांनी दर आठवडी, अडीच तास हलका व्यायाम किंवा सव्वा तास जोरदार व्यायाम करावा.असा व्यायाम निवडा ज्यात तुम्हाला आनंद मिळेल. जसं की, बास्केटबॉल, टेनिस, फूटबॉल, भरभर चालणं, सायकल चालवणं, बागकाम करणं, लाकूड तोडणं, पोहणं, पळणं किंवा इतर व्यायाम करणं.

५ पुरेशी झोप घ्या

प्रत्येकाच्या झोपेचं प्रमाण वेगवेगळं आहे. बरेच नवजात बालके दिवसाला १६ ते १८ तास झोपतात, १ ते ३ वर्षांची मुलं दिवसाला जवळपास १४ तास झोपतात, आणि ३ ते ४ वर्षांची मुलं दिवसाला जवळपास ११ ते १२ तास झोपतात. शाळेत जाणाऱ्या मुलांना कमीतकमी १०; किशोरवयीनांना ९ ते १० तर प्रौढांना ७ ते ८ तास झोप घेणं आवश्यक आहे.
पुरेशी झोप ही गरजेची आहे; त्याला पर्याय नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुरेशी झोप झाल्यानं फायदा होतो, जसं की,मुलांची आणि किशोरवयीनांची शारीरिक व मानसिक वाढ होते,नवीन माहिती शिकणं आणि लक्षात ठेवणं सोपं जातं,हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळं पचनशक्ती सुधारून वजन नियंत्रणात राहतं,हृदय व रक्तवाहिनी निरोगी राहते,रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पुरेशी झोप न झाल्यामुळे वजन वाढतं, डिप्रेशन येतं, हृदयविकार व डायबेटीस होतो. शिवाय, झोप पूर्ण न झाल्यामुळं भयानक अपघातही होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे.