समतोल फाउंडेशन ही विविध कारणांमुळे घरातून पळून जाणाऱ्या लहान वयातील मुलांना आधार आणि आसरा देणारी ठाणे शहरातील एक संस्था आहे.

भारतातील अनेक प्रांतांतून घरदार सोडून आलेल्या आणि भीक मागणे, बुटपॉलिश करणे अथवा पडेल ती कामे करणाऱ्या अशा मुलांना संस्थेत आणून त्यांच्यात पुन्हा घराची ओढ निर्माण करण्याचे कार्य २००५ सालापासून समतोल फाउंडेशन करत आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील एका छोट्याशा गाळ्यात सुरू असलेल्या या संस्थेचे काम मात्र मोठे आहे. आजवर सहा हजार मुलांना समतोलने पुन्हा आपल्या घरट्याकडे सुखरूप पाठवले आहे.

स्वप्नांच्या मागे लागून मायानगरीत हरवणाऱ्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्याचे काम संस्था करते. या संस्थेच्या मदतीसाठी आतापर्यंत जेवढय़ा लोकांना भेटलोय त्यातील बहुतांश लोकांनी लहानपणी हरवल्याचा अनुभव सांगितला आहे. हा प्रश्न सर्वाच्याच जिव्हाळ्याचा आहे. पूर्वी हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर उभे राहत. मुंबईत पळून येणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त आहे. आतापर्यंत आम्ही सहा हजारांहून अधिक मुलांना घरी सोडले आहे. महिन्याला संस्थेत ३० ते ४० मुले येतात. त्यांच्यासाठी आणखी एका निवासस्थानाची सोय करण्याचा विचार आहे. या निधीतून त्याची सुरुवात करता येईल.

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    Samatol Foundation

    Gala No. 50 & 55

    Dadoji Konddev Stadium

    Khartan Road

    Thane West

    400601

  • दूरध्वनी

    022-65686661, 25454838 

    Vijay Jadhav

    Mob No.: 9892961124