ताहुली

कल्याण, कर्जत व पनवेल या विभागात हा किल्ला आहे. ताहुलीला किल्ला किंवा गड म्हणणे तसे अयोग्यच. हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे. उंच बेलाग कडे, जाण्याच्या अनगड वाटा यामुळे ताहुली वैशिष्टपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षितही आहे.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे ताहुलीच्या पठारावर संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे. या वाटेत आणखी दोन आश्रम लागतात. पठाराच्या सर्वात वरच्या भागाला ‘दादीमा ताहुली’ म्हणतात. येथे ५ पीर आहेत. समोरच एक छोटेसे घर देखील आहे. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो. एका सुळक्याचे नाव ‘दाऊद’ तर दुसर्याचे नाव ‘बामण’ आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :
ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१. अंबरनाथ वरून :दुसरी वाट अंबरनाथ वरून जाते. अंबरनाथवरुन बाहेर पडून बदलापुरचा रस्ता ओलांडावा. थोडाच वेळात काकुली नावाचा तलाव लागतो. या काकुली तलावापासून थोडाच अंतरावर एक डोंगराची सोंड वर ताहुलीच्या तीन सुळक्यांपाशी पोहोचते. या वाटेने ताहुली पठार गाठण्यास ४ तास लागतात.
२. कुशीवली वरून कल्याण मलंगगड रोडवर कुशीवली गावाच्या स्टॉपवर उतरणे. गावाच्या बाहेरूनच थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी वाट ताहुलीला गेली आहे. ही वाट दोन डोंगराच्या बेचक्यामधून वर चढते. कुशीवली गावापासून वर पठारावर जाण्यास अडीच तास लागतात.

राहण्याची सोय : नाही
जेवणाची सोय : नाही
पाण्याची सोय : नाही
जाण्यासाठी लागणारा वेळ : अडीच तास कुशीवली मार्गे, चार तास काकुली लेक मार्गे