घटना

१८८९: फर्डिनांड फोन झेपेलिनने बलूनचा पेटंट घेतला.

१९३१: पहिला भारतीय बोलपट ‘आलमआरा’ नॉव्हेल्टी या सिनेमागृहात दाखवला गेला.

१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

१९८८: जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ.

१९९४: लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित.

२०००: कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

२००१: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.

२००१: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.

२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

जन्म/वाढदिवस

१८७४: फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९५१)

१८७९: अल्बर्ट आइन्स्टाइन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. (मृत्यू: १८ एप्रिल १९५५)

१८९९: इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९२)

१९०८: विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७९)

१९३१: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर(मृत्यू: १३ जानेवारी २०११)

१९३३: ब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.

१९६१: ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.

१९६३: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.

१९६५: आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९७४: पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.

१९७२: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

१९७४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी

१८८३: कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक. (जन्म: ५ मे १८१८)

१९३२: अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन . (जन्म: १२ जुलै १८५४)

१९९८: अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके. (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)

२००३: कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट (जन्म: १५ एप्रिल १९३२)

२०१०: ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर(जन्म: २३ ऑगस्ट १९१८)

२०१८: नरेन्द्र झा (वय ५५ वर्ष) भारतीय अभिनेते

२०१८ : पृथ्वीच्या उत्पत्ती सिद्धांत मांडणारे फिजिसिस्ट प्रोफेसर स्टीफन हॉकिंग