१४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
१७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी.
१८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
१९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
१९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.
१९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७१: भारत पाक युद्ध –पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती.
१९८५: कल्पक्‍कम येथील इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर राष्ट्राला समर्पित
१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

२००६अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.

२०१४: पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.

१९६०: चिंतामण गणेश कर्वे –मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
१९६५: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम –इंग्लिश लेखक व नाटककार (जन्म: २५ जानेवारी १८७४)
१९८०: कर्नल सँडर्स –केंटुकी फ्राईड चिकन (KFC)चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)
२००० : सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल,सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले
देवल यांचं वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती. (जन्म: १८९९)
२००४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे . (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)