१६२०: मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.
१९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.
१९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.
१९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.
१९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
१९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
१९७५: पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र झाला.
१९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.
१९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.
१९९७: संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक
पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर

१७३६: जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट. (जन्म: २४ मे १६८६)
१८२४: फ्रान्सचा राजा लुई (अठरावा). (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)
१९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४)
१९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस . (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड)
१९६५: अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बी. (जन्म: ३१ जुलै १८८६)
१९७३: पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार.
त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे होते. मुजुमदारांकडे ते दत्तक गेले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस होते.
१९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर. (जन्म: १३ जुलै १८९२)
१९९४: जयवंत दळवी –साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले.
ते ठणठणपाळ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)
२००५: लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड. (जन्म: १७ जुलै १९२०)
२०१२: आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर. (जन्म: १२ डिसेंबर १९२६)