जागतिक नागरी संरक्षण दिन
घटना
१५६५: ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.
१८०३: ओहायो अमेरिकेचे १७वे राज्य झाले.
१८६७: नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.
१८७२: यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
१८७३: ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरूवात केली.
१८९३: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.
१८९६: आंत्वान हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
१९०७: टाटा आर्यन अॅन्ड स्टील कंपनीची स्थापना.
१९१२: आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण.
१९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.
१९४८: गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९५८: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात.
१९६१: अमेरिकेत शांति दलाची स्थापना.
१९७८: स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
१९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
१९९८: दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
२००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.
जन्म
१९१०: डेव्हिड निवेन, इंग्लिश अभिनेता.
१९१८: होआव गुलार्ट, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
१९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी
१९२२: यित्झाक राबिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
१९३०: उद्योगपती राम प्रसाद गोएंका
१९४२: रिचर्ड मायर्स, अमेरिकन सेनापती.
१९६८: क्रिकेटपटू सलील अंकोला यांचा जन्म.
१९८०: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी यांचा जन्म.
मृत्यू
११३१: स्टीवन दुसरा, हंगेरीचा राजा.
१७९२: लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
१९८९: महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील
१९९१: एडविन लँड, अमेरिकन संशोधक.
२००३: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे
२०१४:बंगारू लक्ष्मण (वय ७४ वर्ष), भारतीय जनता पार्टी पूर्व अध्यक्ष
२०१६: AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३९)
२०१७:तारक मेहता (वय ८७ वर्ष) -गुजराती साहित्यकार तारक मेहता