१४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.
१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
१८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९३१: नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
१९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
१९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.
१९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग
दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
१९९५: घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्‍च न्यायालयाचा निर्णय.
१९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.
यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.
१९९८: : क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च सन्मान जाहीर
२००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.
२०१३: पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले
आणि १३० लोकांना जखमी केले.
२०१४:नासाचं मावेन अन्तरिक्षयान यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत पोहोचलं.

१५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) .
१५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव. (जन्म: १५ एप्रिल १४६९)
१८२८: झुलु सम्राट शक .
१९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग . (जन्म: २८ जानेवारी १८६५)
१९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी . (जन्म: २ सप्टेंबर १८७७)
१९६९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस.
१९७०: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय. (जन्म: ३० मार्च १८९९)
१९९१ : दुर्गा खोटे –हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला.
१९८२ मध्ये मी दुर्गा खोटे हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (जन्म: १४ जानेवारी १९०५)
१९९४: जी. एन. जोशी –भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना
संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (जन्म: ६ एप्रिल १९०९)
२००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो.
२०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी. (जन्म: ५ जानेवारी १९४१)