महत्त्वाच्या घटना

१८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
१९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.
१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC)या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
१९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.
२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव
आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.