महत्त्वाच्या घटना
१९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मन हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत
प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
१९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
१९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank)आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(International Monetary Fund)स्थापन केले.
१९४५: कोरिया देशाची फाळणी झाली.
१९४९: इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.
१९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
२००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
जन्मदिवस / वाढदिवस
१५७१: जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ योहान्स केप्लर. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)
१६५४: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली. (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)
१७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली.
१७९७: मिर्झा असदुल्लाखान गालिब प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले,
कलेचे आसक्त. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)
१८२२: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर. (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)
१८९८: डॉ. पंजाबराव देशमुख –स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या
तोडीचे मानले जाते. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)
१९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
१९४४: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा. (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)
१९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान.
१९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस.
मृत्यू / पुण्यतिथी
१९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग.
१९२३: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल. (जन्म: १५ डिसेंबर १८३२)
१९४९: भालकर भोपटकर .
१९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक.
१९७२: कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन. (जन्म: २३ एप्रिल १८९७)
१९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे .
२००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे.
२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या. (जन्म: २१ जून १९५३)
२०१३: अभिनेता फारुख शेख.