जन्मदिवस / वाढदिवस
१७३५: अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स. (मृत्यू: ४ जुलै १८२६)
१८८७: सुकुमार रॉय –बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक
सत्यजित रॉय यांचे वडील (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)
१९०९: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा. (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)
१९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी . (मृत्यू: १६ जुलै २०१३)
१९४९: केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन. (मृत्यू: ३ मे २००६)
१९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू .
१९६०: अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना.
मृत्यू / पुण्यतिथी
१८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)
१९७४: बेगम अख्तर –गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (जन्म: ७ आक्टोबर १९१४)
१९९०:व्ही. शांताराम –चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)०१)
१९९०: अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)
१९९४: केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
१९९६: प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये –लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)
१९९८: लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)
२००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.
२०११: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)
२०१८: यशवंत देव, मराठी कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक. वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला.
आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर सादर केलेला भावसरगम हा कार्यक्रम चांगलाच गाजला. (जन्म: १ नोव्हेंबर, १९२६)