आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन

१९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
१९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
१९९५: कॅनडातील क्युबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
२०१३:आंध्र प्रदेशच्या महबूबनगर जिल्ह्यातील पालेम गावाजवळील पुलाच्या कठड्याला धडकून बसगाडीला लागलेल्या आगीत ४५ ठार, ७ जखमी.
२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.
२०१४: श्रीलंकेत भूस्खलनात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू.