जन्मदिवस / वाढदिवस
१८६६: कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत –मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता
प्रसिद्ध झाली नाही. केशवसुतांची कविता हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या तुतारी, नवा शिपाई, गोफण केली छान
इ. कविता प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)
१८८५: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर . (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२)
१९००: जर्मन नाझी अधिकारी हाइनरिक हिमलर. (मृत्यू: २९ एप्रिल १९४५)
१९०७: गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)
१९१४:बेगम अख्तर –गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (मृत्यू: ३० आक्टोबर १९७४)
१९१७: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी . (मृत्यू: १३ मे २०१० – पुणे)
१९२९: आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन.
१९५२: रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन.
१९५९: एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्ट चे निर्माते शमौन कोवेल.
१९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे.
१९७८: भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान.
मृत्यू / पुण्यतिथी
१७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग. (जन्म: २२ डिसेंबर १६६६)
१८४९: अमेरिकन गूढ व भयकथांचा लेखक व कवी एडगर अॅलन पो. (जन्म: १९ जानेवारी १८०९)
१९५१: फिलिप्स कंपनी चे सहसंस्थापक एंटोन फिलिप्स. (जन्म: १४ मार्च १८७४)
१९७५: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी.. (जन्म: १८ जानेवारी १८८९ –मुळबागल, कोलार, कर्नाटक)
१९९८: महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक .
१९९९: उमाकांत निमराज ठोमरे –साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक,
बालसाहित्यकार (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ –अहमदनगर)
२०११: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया. (जन्म: १८ ऑक्टोबर १९२५)