आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
जुन्यात आपण रंगतो… स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!
खरं तर सगळे कागद सारखेच… त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.
जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
कलेच्या क्षेत्रामध्ये तुमचं जे काही व्यक्तित्व, जे काही अस्तित्व, जी काही अस्मिता असेल, जे गुण असतील, ते तुमचे स्वत:चे घेऊन तुम्हाला उभं रहावं लागतं. तुम्ही डिट्टो अमुक तमुक झालात कि डिट्टोच राहिलात आयुष्यभर.
परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!
मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रापेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आयुष्यभर आठवत असते.
जुन्यात आपण रंगतो… स्मृतींची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!
― पु. ल. देशपांडे
मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!
खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
अत्यंत महागडी, न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.
आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.
– व. पु. काळे
फुलांचा सुगंध केवळ वार्याच्या दिशेने पसरतो परंतु एका व्यक्तीची चांगुलपणा सर्व दिशेने पसरतो.
सर्वात मोठा गुरू मंत्र आहे: कधीही आपल्या गुप्त गोष्टी कोणाशीही सांगू नका. ते तुमचा नाश करील.
जन्माद्वारे नव्हे तर मनुष्य कृत्यांद्वारे महान आहे.
इतरांच्या चुकीतुनही शिका कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल.
मत्सर हे अपयशाचे दुसरे नाव आहे.
प्रत्येक साप विषारी नसतो पण प्रत्येक सापाला अस भासवाव लागत तो विषारी आहे.
काही करण्याची प्रेरणा होते तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.
– आर्य चाणक्य
आपण धोक्यांपासून सुरक्षित राहावे अशी प्रार्थना करू नये. परंतु त्यांना तोंड देत असताना निर्भय होण्यासाठी प्रार्थना करूया.
तथ्ये बरेच आहेत, परंतु सत्य एक आहे.
उभे राहून आणि पाण्याकडे एकटक पाहून आपण केवळ समुद्र ओलांडू शकत नाही.
फुलपाखरू महिने मोजत नाही पण क्षण मोजतो, आणि त्याला पुरेसा वेळ आहे.
मैत्रीची खोली परिचयाच्या लांबीवर अवलंबून नाही.
प्रेम मालकी हक्क सांगत नाही, पण स्वातंत्र्य देते.
जेव्हा आपण नम्रतेत महान होतो तेव्हा आपण महानतम जवळ येतो.
फुल जे एकटं आहे त्याला असंख्य असण्याऱ्या काट्यांचा मत्सर करण्याची गरज नसते.
– रविंद्रनाथ टागोर
आपण काय आहोत हे आपल्याला ठाऊक आहे, परंतु आपण काय असू शकतो हे आपल्याला ठाऊक नाही. We know what we are, but know not what we may be.
असावे, किंवा नसावे, हा प्रश्न आहे. To be, or not to be, that is the question.
तो एक शहाणा पिता आहे जो आपल्या मुलाला ओळखतो. It is a wise father that knows his own child.
अनेकांना ऐका, काहींशी बोला! Listen to many, speak to a few.
सर्वांवर प्रेम करा, काहींवर विश्वास ठेवा, कुणाशीच चुकीचं करू नका. Love all, trust a few, do wrong to none.
– विल्यम शेक्सपियर
आपण जर भूत आणि वर्तमान यांच्यात भांडण सुरु केले तर आपल्याला असे वाटेल की आपण भविष्य गमावित आहोत.
वृत्ती एक छोटीशी गोष्ट आहे ती मोठा फरक पाडते. Attitude is a little thing that makes a big difference.
जे मिळते त्यानुसार आपण उदरनिर्वाह करतो, परंतु आपण जे काही देऊ करतो त्यानुसार आपण एक आयुष्य बनवतो.
सुधारण्यासाठी ते बदलणे आहे; परिपूर्ण होण्यासाठी अनेकदा बदलणे आहे. To improve is to change; to be perfect is to change often.
आपल्याकडे शत्रू आहेत? याचा अर्थ असा की आपण कधीतरी आपल्या जीवनात कशातरी साठी उभे राहिले आहात… You have enemies? Good. That means you have stood up for something, sometime in your life.
– विन्स्टन चर्चिल
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
देवाला कोणताच धर्म नसतो.
आम्ही आमचा स्वाभीमान कुणाला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.
धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.
बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.
अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.
माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.
– महात्मा गांधी
आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल.
शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning (शिकण्यामध्ये प्रथम प्रयत्न) असाच आहे.
कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते कारण आज मी मागे वळून बघतो तर मला माझे मार्क मला हसवत नाहीत पण आठवणी हसवतात.
या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी, त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.
झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही.
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.
सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात.
काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजलवत असतो.
अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.
जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते.
आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कठीण आहात.
आत्मनिभारते मुळेच आत्मसम्मान मिळत असते याची आपल्याला जाणीव नसते.
यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील.
आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.
देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते. आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमता ना बाहेर आणायला मदत करत असते.
चला आपले आज आपण येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्या साठी त्याग करू.
जेंव्हा तुमची सही हि ऑटोग्राफ बनते तेंव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा.
त्रास हा यशाचा सार आहे.
देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शेवटच्या बाकावर सापडतात.
विचार हे भांडवल, उदयोग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे.
समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे.
स्वप्ने सत्यात उतरवण्या अगोदर प्रथम त्या तुम्हाला बघावे लागतील.
तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील.
मी हँडसम (देखणा) व्यक्ती नाहीये पण मी माझे हँड गरजू कोणीतरी (someone) ला मदत म्हणून देऊ शकतो. सुंदरता हि मनात असते तोंडावर नव्हे.
आपल्या सर्वांमध्ये एकसमान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते.
तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला एका मानाने ध्येया कडे समर्पित असायला हवे.
आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. ससर्व भ्रमंड तुमचं मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो.
यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते.
आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे. तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कानेच जिंकता येईल.
तुमच्या सहभागा शिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागा सोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही.
यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे.योग्य निर्णय कशे घ्यावे?? अनुभवाने.अनुभव कशे घावे?? चुकीचे निर्णय घेऊन.
तुमच्या नौकरी वर प्रेम करा पण कंपनी वर करू नका. कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल.
एखाद्याला हरवणे खूप सोप्पे आहे, पण त्याला जिंकणे खूप अवघड असते.
इंगजी शब्द end चा अर्थ शेवट नसून तो “Effort Never Dies” म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर NO म्हणजे नाही चा अर्थ “Next Opportunity” असा होत जो नवीन संधी असा होतो.
तुमच्या पहिल्या यशा नंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात.
जर तुम्हाला सुर्या सारखं चमकायचे असेल तर प्रथम त्याचा सारखं जाळावे लागेल.
तुमच्या जीवनात कसले हि उतार चढाव आले तरी तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे.
वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.
समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.
धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.
– स्वामी विवेकानंद
शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.
मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.
शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.
सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.
स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.
लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.
जर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हंटले तर कुत्र्याला पाय किती? उत्तर असेल चार. कारण शेपटीला पाय म्हंटल्याने ते पाय होत नाही..
मी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे. त्याच श्रेय फक्त आईलाच देईन.
नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करतो.
जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.
जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.
– अब्राहम लिंकन
ज्या माणसांनी मला नाही म्हणून सांगितले त्या सर्वांचा मी आभारी आहे कारण त्यामुळेच त्या गोष्टी मी स्वतः करू शकलो.
मी सर्वांना सारखीच वागणूक देतो, तो कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू असो किंवा एखादा सफाई कामगार.
ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल.
जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा.
प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.
जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजली नाही.
– अल्बर्ट आइंस्टाइन
पैसा तुमचा आहे पण संसाधने हे समाजाचे आहेत.
आपल्या खराब सवयींबद्दल गंभीरतेने विचार करा. त्या बद्दला जेवढं गरज आहे तेवढंच घ्यायची सवय लावा.
पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे समाजाचे आहेत.”
महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल. जसे पाण्याचं अपव्यय न करणे, वीजेची बचत करणे, अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे. अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ.
आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत. आपण आपली प्रतिष्ठा जपण्या साठी खूप ऑर्डर करतो. इतरांना पार्टी देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो.
– रतन टाटा
जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.
जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.
भूतकाळ , भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे. नाती आणि विश्वास. हाच विकासाचा पाया आहे.
खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते. पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला पण काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.
जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात , त्यांचा साठी पूर्ण जग आहे जिंकायला.
भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.
मला नाही हा शब्द ऐकू येत नाही.
काहीतरी मिळवण्या साठी विचारपूर्वक धोका पत्करावे लागते.
स्वप्न बघाल तरच साध्य कराल ना.
मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.
आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे. रिलायंस आणि भारत साठी हेच तर माझे स्वप्न आहे.
आपण आपल्या शाशकांना बदलू शकत नाही, पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो.
फायदा कमावण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही
जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमचा मागे येईल.
कठीण परिस्थिती मध्ये देखील ध्येयाला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.
युवानां एक चांगले वातावरण द्या. त्यांना प्रेरित करा. त्याना लागेल ती मदत करा. त्यांच्यात एक आपार उर्जा चे श्रोत आहे. ते करून दाखवतील.
– धीरूभाई अंबानी
सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.
स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका, जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.
माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.
तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.
जर तुम्हाला तुमचे शिक्षक कडक वाटतात असतील तर बॉस येई पर्यंत थांबा.
आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.
तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे. पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायच असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा हवाच.
टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते.
मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतील
मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील
जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
– बिल गेट्स
उत्कटता असलेले लोकच जगाला बदलून आणखी चांगले बनवतात.
शिकण्याची भूक बाळगा. काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा.
कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही, स्वतः वरचा विश्वास ढळू देऊ नका.
इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.
तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे आयुष्य जगणे सोडून दया.
मी रोज सकाळी स्वःला आरशात पाहून विचारतो की ‘जर आजचा दिवस माझा जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर मी तेच करेन का ? जे आज करणार आहे’. जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही’असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.
ज्या लोकांना असा वेडा विश्वास असतो की ते जगही बदलू शकतात ते तेच जग बदलतात.
‘नवीन शोध’च एक लीडर आणि एक अनुयायी यामध्ये अंतर दाखवते.
– स्टीव्ह जॉब्स
मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.
– कल्पना चावला